नवी दिल्ली : भारतात करोना संसर्गाची २० हजारांहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर गेल्या २४ तासांत या विषाणूमुळे ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, देशभरातून २०,२७९ नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर एकूण संक्रमित लोकांची संख्या आता ४,३८,८८,७५५ झाली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांना वारंवार काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

आतापर्यंत मिळालेल्या महितीनुसार, ५.२६ लाख रुग्णांना करोनाच्या संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, शनिवारच्या तुलनेत आज भारतात संसर्गाची कमी प्रकरणे आढळून आली आहेत आणि मृतांचा आकडाही मागील दिवसाच्या तुलनेत कमी आहे.

मनसे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती, शॅडो कॅबिनेटवरुनही टोला : दिपाली सय्यद
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय करोना रुग्णांची संख्या आता १,५२,२०० झाली आहे, जी एकूण प्रकरणांच्या ०.३५ टक्के आहे. गेल्या २४ तासांत कोविड-१९ मधून १८,१४३ रुग्ण बरेही झाले आहेत, त्यानंतर आतापर्यंत बरे झालेल्यांचा आकडा ४,३२,१०,५२२ वर पोहोचला आहे. मंत्रालयाने सांगितले की, देशातील पुनर्प्राप्ती दर ९८.४५ टक्के आहे. तर मृतांची संख्या १.२० आहे. भारतात आतापर्यंत ५,२६,०३३ रुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी ३६ मृत्यू फक्त शनिवारी झाले.

‘सध्या राज्यात मान्सून सेल सुरू आहे, त्यामुळे…’, सचिन अहिर यांची शिंदे गटावर सडकून टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here