मुंबई: काही दिवसांपूर्वी मराठी सिनेइंडस्ट्रीत अप्सरा सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. हल्ली अभिनेत्रींच्या ड्रेसवरूनदेखील त्या गरोदर आहेत का, त्या बेबी बंप लपवत आहेत का? अशा चर्चा होतात. एखाद्या अभिनेत्रीने सैलसर ड्रेस परिधान केला तर ती प्रेग्नंट असावी असाही अंदाज थेट लावला जातो. तसंच काही तरी सोनालीच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. तिनं नुकताच काळ्या रंगाचा पांढरे ठिपके असणारा अर्थात पोलका डॉट्स प्रकारातील ड्रेस घातला होता. तिचे काळ्या ड्रेसवरचे फोटो व्हायरल झाल्यानंतर ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

हे वाचा-अभिनेत्रीचे ते उपकार फेडू शकले नाही मनोज कुमार; वाचा नेमकं काय घडलं होतं?

अनुष्का शर्मा, नताशा स्टॅनकोव्हिक यांनी देखील त्यांच्या प्रेग्नन्सीविषयी सांगताना काहीसे अशाच प्रकारातील ड्रेस घातले होते. त्यामुळे आता कुणी अभिनेत्रीने असा ड्रेस परिधान केला की ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरू होतात. सोनालीच्या बाबतीतही असंच घडलं. दरम्यान यावर सेलिब्रिटी फोटोग्राफर शशांक साने याने एक मजेशीर पोस्ट केली आहे. सोनालीचे ते काळ्या-पांढऱ्या ड्रेसमधील फोटो शशांकनेच काढले आहेत.

हे वाचा-‘द आर्चीज’मध्ये या स्टारकिड्सना ऑडिशन न देताच भूमिका मिळाली का?

काय आहे शशांकची पोस्ट?

शशांकने सोनालीचे त्याच ड्रेसमधील आणखी काही फोटो शेअर केले आहेत. त्याने सोनालीच्या प्रेग्नन्सीच्या वावड्या उठवणाऱ्यांना ट्रोल करत या फोटोंना असे कॅप्शन दिले आहे की, ‘दादा… काही गुड न्यूज नाहीये! ता.क. फोटो बघून प्रेग्नन्सी सांगणाऱ्यांनी त्वरित मेडिकल कॉलेज मध्ये अॅडमिशन घ्यावी. देशाला अशा जीनियस डॉक्टर्सची गरज आहे’. सोनालीने देखील तिच्या इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे.

सोनालीची अशी होती प्रतिक्रिया

या एकंदरित सर्व प्रकारावर अप्सरेनं देखील मौन सोडलं होतं. सोनालीनं ती प्रेग्नंट नसल्याचं सांगितलं. तिने यावेळी अशी प्रतिक्रिया दिली होती की, ‘माझ्या प्रेग्नंसीबद्दल चर्चा करणाऱ्यांना एकच गोष्ट सांगते की, मी प्रेग्नंट नाही. मी आताच ‘तमाशा लाइव्ह’मध्ये माझा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स डिलिव्हर केला आहे. सिनेमागृहात जाऊन पाहा.’

सोनाली कुलकर्णी

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर वर्षाच्या सुरुवातील ‘पांडू’ सिनेमात सोनालीची भाऊ कदमसोबत जमलेली जोडी प्रेक्षकांना आवडली. ‘पाँडीचेरी’मध्येही तिने जबरदस्त काम केलं आहे. आता सध्या ती ‘तमाशा लाइव्ह’मुळे चर्चेत आहे. या संगीतमय सिनेमात तिने एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे. गेल्या वर्षी सोनालीने कुणाल बेनोडेकर याच्याशी दुबईत साध्या पध्दतीने लग्नं केलं होतं. यावर्षी ७ मे रोजी तिनं पुन्हा एकदा लंडनमध्ये कुणालशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर त्यांचे मेक्सिकोमधील हनिमूनचे फोटोही खूप व्हायरल झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here