गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट जवळ आज सकाळी झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. अपघातातून जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. हा अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या.

Solapur St Bus Accident
सोलापूर-गाणगापूर एसटी बसला अपघात

हायलाइट्स:

  • सोलापूर-गाणगापूर एसटी बस पलटी
  • ३५ हून अधिक जण जखम, काही गंभीर
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश
सोलापूर: सोलापूर-गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात ३५ हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास अक्कलकोट – मैंदर्गी रस्त्यावरील देशमुख शेतालगत बस पलटी होऊन ही मोठी दुर्घटना घडली. या बसमध्ये जवळपास ७० प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच प्रवाशांची प्रकृती ही गंभीर आहे. याप्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने जखमींना जवळपासच्या रुग्णालयांमध्ये हलवण्याचे आदेश दिले आहेत.

गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट जवळ आज सकाळी झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. अपघातातून जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. हा अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : solapur st bus accident bus overturned more than 35 passengers were injured cm eknath shinde gave orders to take good care of them
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here