Chandrakant Patil : ‘आम्ही सर्वांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची भाजपच्या केंद्रीय नेतृत्तवानं गंभीर दखल घेतल्याचं बोललं जातंय.

 

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील

हायलाइट्स:

  • चंद्रकांत पाटील याचं वक्तव्य चर्चेत
  • दिल्लीतल पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल
  • पक्षश्रेष्ठींच्या आदेशानं व्हिडिओ हटवले
मुंबई : भाजपच्या पनवेल येथील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असल्याचं कळलं आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वानं पाटील यांच्या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावरून काढून टाकण्याचे आदेश दिल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडी सरकारचं सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर आली. केंद्रीय नेतृत्वाचा हा निर्णय राज्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना अद्याप पचलेला नाही, हे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याच्या माध्यमातून समोर आलं. या प्रकाराची भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वानं याची गंभीर दखल घेतल्याचं कळतंय.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
शनिवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत वक्तव्य केलं. ‘आम्ही सर्वांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. परंतु, या निर्णयामुळे मला दुःख झाले,’ असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पाटील यांच्या या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटू लागले.

‘तुमच्याकडे इन्कम नसेल तर तुमचं चारित्र्य पाहिलं जातं’, सेना नेत्याचं भाजपवर टीकास्त्र
मनावर दगड ठेवून निर्णय मान्य

पनवेल येथील आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अनेक राजकीय, सामाजिक विषयांवरील ठराव संमत करण्यात आले. यात प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाच्या ठरावाचाही समावेश आहे. या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, मागील अडीच वर्षांत राज्यात काय परिस्थिती होती हे सर्वांनीच पाहिले. राज्यात सत्तांतर होण्याची गरज होती, तसे ते झाले. हा सत्ताबदल होत असताना योग्य संदेश देईल अशा व्यक्तीची गरज होती. असे असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून मान्य केला. केंद्रीय नेतृत्वाच्या या निर्णयाने आपल्या सर्वांनाच दु:ख झाले. पण ते पचवून आपण पुढे गेलो असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. पाटील यांचे हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, यासंदर्भात आशिष शेलार म्हणाले, ‘या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ बाहेर आलाच कसा हा अंतर्गत विषय आहे.’
राष्ट्रवादीत नेतृत्वबदल होणार? चर्चांना उधाण आल्यानंतर अखेर रोहित पवार म्हणाले…
‘फडणवीसांना सॅल्युट केला पाहिजे’

राज्यात वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे राहिलेले मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. पाच वर्षे मुख्यमंत्री राहिल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करतील असे कोणालाही वाटले नव्हते. पण केंद्रीय नेतृत्वाने निर्णय दिला आणि तो देवेंद्र फडणवीस यांनीही मानला. यासाठी आपण सर्वांनी त्यांना सॅल्यूट केला पाहिजे, असे आवाहन चंद्रकात पाटील यांनी केले. तेव्हा सभागृहातील भाजपचे सर्व प्रतिनिधी उभे राहिले आणि त्यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले.

साहेब तुम्ही असं करायला नको होतं, शिवसैनिकाचा संदिपान भुमरेंना फोन? ऑडिओ क्लिप व्हायरल

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : bjp seniors leaders take chandrakant patil statement seriously on eknath shinde
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here