मुंबई: करण जोहर आणि त्याचा कॉफी विथ करण हा शो सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा करण त्याच्या या शोचा सातवी सीझन घेऊन ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल झाला आहे. पहिल्याच एपिसोडमध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांनी धमाल केली तर दुसऱ्या एपिसोडमध्ये सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी काही रहस्य उघड केली. या शोमध्ये येणाऱ्या सेलिब्रिटींना रॅपिड फायर राऊंड तर खूपच हटके आहे. खरी आणि फटाफट उत्तर देणाऱ्या सेलिब्रिटींच्याच नव्हे तर प्रेक्षकांच्याही नजरा गिफ्ट हँपरमध्ये काय आहे याकडे लागलेल्या असतात. सेलिब्रिटींनाही हे गिफ्ट हॅम्पर आपल्यालाच मिळावं असं वाटत असतं. काय काय असतं त्या हॅम्परमध्ये?
अरे हे काय चाललंय? रणवीरनंतर आणखी एक अभिनेता कॅमेऱ्यासमोर झाला न्यूड; बायकोनेच केलं फोटोशूट
करण जोहरच्या शोमध्ये येणाऱ्या सेलिब्रिटींकडून येणारे किस्से ऐकण्यात प्रेक्षकांचे कान लागलेले असतात. त्यांच्या आयुष्यातील खाजगी गोष्टीही करण या सेलिब्रिटींकडून काढून घेतो. खरी मजा येते ती या शोमधील वेगवेगळया राउंडमध्ये. काही गेम तर असतातच पण रॅपिड फायरमध्ये फटाफट येणारी उत्तरं मनोरंजन करतात. यामध्ये जिंकणाऱ्या सेलिब्रिटींना करण हे गिफ्ट हॅम्पर देतो.

‘भावा, त्या पॉझमध्येही मला तुझा चेहरा दिसत होता’ किशोर कदमसाठी भरभरून बोलले किरण माने


नव्या सीझनमध्ये करणने त्याच्या गिफ्ट हॅम्परमध्ये अनेक खास वस्तू घातल्या आहेत. जरा या बॉक्समध्ये डोकावून पाहिलं तर हे हॅम्पर किती किंमती आहे ते लक्षात येईल. यामध्ये आहे गोल्ड ज्वेलरी, आयफोन, आयपॅड, एक स्पीकर, कॉफी मशीन आणि आजियो ब्रँडच्या वस्तूंचा समावेश आहे. करण जेवढा पैसा या शोसाठी ओततो त्यात तो या गिफ्ट हँपरवर जास्त खर्च करतो. करणच्या या शोच्या सातव्या सीझनमध्ये लवकरच पुढच्या भागात क्रीती सेनन, टायगर श्रॉफ, वरूण धवन, कियारा अडवाणी यांच्यासारखे कलाकार येणार आहेत. त्यांच्याइतकीच उत्सुकता किंमती गिफ्ट हॅम्परचीही आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here