devmanus 2 end, ‘देवमाणूस’ मालिका होणार बंद, नवीन मालिकेचं नावही आलं समोर – popular crime thriller devmanus 2 to go off air soon, new show aapi amchi collector to replace it
मुंबई: छोट्या पडद्यावरची ‘देवमाणूस’ ही मालिका कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत असते. पहिल्या पर्वाला मिळालेल्या यशानंतर मालितेचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण या मालिकेवर प्रेक्षक नाराज असल्याचंही दिसून आलंय. सोशल मीडियावर प्रेक्षक , नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसतात. मालिकेचं कथानक भरकटत आहे, असं प्रेक्षकांनी म्हटलं होतं. पण असं असलं तरी मालिकेत एकामागोमाग एक ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. मालिका लवकरच निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.
सध्या मालिकेत सुरू असलेल्या कथानकावरून मालिका संपणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसचं मालिकेचा हा शेवट नसून तिसरा भाग येणार असल्याचंही म्हटलं जात आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वापासूनचा चाहता वर्ग मोठा आहे.त्यामुळं अशा चर्चांना अधिक हवा मिळत आहे. डॉक्टरचा खेळ खल्लास करायचा म्हणजे त्याच्यापेक्षाही दहा पाऊलं पुढं असणारा व्यक्ती हवा, त्याच्या पेक्षाही वजनदार व्यक्तीमत्व हवं, यासाठी मालिकेत मार्तड जामकर या अधिकाऱ्याची एन्ट्री करण्यात आली. अभिनेते मिलिंद शिंदे ही भूमिका साकारत आहे. त्यांच्या येण्यानं मालिकेला वेगळंच वळण आलं आहे. अरे हे काय चाललंय? रणवीरनंतर आणखी एक अभिनेता कॅमेऱ्यासमोर झाला न्यूड; बायकोनेच केलं फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोंवरून ही मालिका आता महत्त्वाच्या आणि निर्णायक टप्प्यावर आल्याचं पाहायला मिळतंय. डॉक्टर जामकरच्या जाळ्यात अडकणार का? की यावेळीही तो यातून बाहेर पडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
नवीन मालिका? मालिका संपणार असल्याचं आणखी एक कारण म्हणजे, देवमाणूसच्या निर्मात्यांची आणखी एक नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आप्पी आमची कलेक्टर’ असं या मालिकेचं नाव असून नुकताच या मालिकेचा मुहूर्त पार पडला होता. याचे फोटोही अनेक कलाकरांनी शेअर केले आहेत.