भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक झाला आहे. श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले आहे. कोल्हापुरातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कठीण परिस्थितीत संघर्ष करायला शिकवणारी मायमाऊली गेल्याने दादांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झालीय.

हायलाइट्स:
- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक
- श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचं वृद्धापकाळाने निधन
- चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर दु:खाचा डोंगर
घरची परिस्थिती अतिशय हालाखीची असताना दादांच्या मातोश्री सरस्वती पाटील यांनी अतिशय संघर्षात दिवस काढले. बच्चू पाटील कापड गिरणीत कामाला असताना, पैसे अतिशय कमी मिळत असताना त्यांनी संसाराचा गाडा हाकला. चंद्रकांतदादांना शिक्षण दिलं, संघर्षाची प्रेरणा दिली. माझ्या आयुष्यात, प्रवासात माझ्या आईचा सर्वाधिक वाटा राहिलाय, अशी भावना चंद्रकांतदादा नेहमी बोलून दाखवायचे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्रींनी सर्व भावंडांवर स्वाभिमानाने आणि मेहनतीने जगण्याचे संस्कार केले. या संस्कारांच्या शिदोरीवरच चंद्रकांतदादा पाटील आणि त्यांचे सर्व कुटुंब आयुष्यभर वाटचाल करत आहे. दादांच्या मातोश्रीवर आज दि. २४ जुलै रोजी रात्री ८.३० वा कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : bjp state president chandrakant patils mother passed away at the age of 91
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network