कृणाल पांड्याने आज रविवारी २४ जुलै दुपारी ही आनंदाची बातमी सर्वांना दिली. त्याने ट्विट करत ‘कवीर कृणाल पंड्या’ अशा कॅप्शनसह स्वतःचे व पत्नी पंखुडीचे फोटो आपल्या मुलासह पोस्ट केले. त्यानंतर अनेकांनी त्याचे अभिनंदन केलं आहे. कृणालने २०१७ मध्ये पंखुडी शर्मा हिच्याशी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर आता पाच वर्षांनी त्यांच्या कुटुंबात नव्या सदस्याचे आगमन झालं आहे.
कृणाल याने आतापर्यंत भारतीय क्रिकेट संघासाठी ५ एकदिवसीय आणि १९ टी-२० सामने खेळले आहेत. ३१ वर्षीय कृणाल आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळताना प्रसिद्धीस आला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात जागा मिळाली. यावर्षीच्या आयपीएलमध्ये तो लखनऊ सुपरजायंट्स संघासाठी खेळला होता. कृणालचा लहान भाऊ हार्दिक हा देखील भारतीय संघासाठी खेळतो. हार्दिकने नुकतेच भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. आपल्या मोठ्या भावाला पुत्ररत्न प्राप्त झाल्यानंतर हार्दिकनेही इंस्टाग्राम स्टोरीद्वारे त्यांचे अभिनंदन केल. हार्दिक सध्या ग्रीस येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. हार्दिक व त्याची पत्नी नताशा यांना देखील अगस्त नावाचा एक मुलगा आहे.