राज्य भाजपचे उपाध्यक्ष बेर्नार्ड एन. मरक यांच्यावर वेश्या व्यवसाय चालवत असल्याचा आरोप झाला आहे. पोलिसांनी छापेमारी करून सहा अल्पवयीन मुलांची सुटका केली. कारवाईदरम्यान पोलिसांना दारूच्या जवळपास ४०० बाटल्या आणि ५०० हून अधिक कंडोम सापडले.

 

marak
मेघालय भाजपचे उपाध्यक्ष बेर्नार्ड एन. मरक
शिलाँग: राज्य भाजपचे उपाध्यक्ष बेर्नार्ड एन. मरक यांच्यावर वेश्या व्यवसाय चालवत असल्याचा आरोप झाला आहे. पोलिसांनी छापेमारी करून सहा अल्पवयीन मुलांची सुटका केली. कारवाईदरम्यान पोलिसांना दारूच्या जवळपास ४०० बाटल्या आणि ५०० हून अधिक कंडोम सापडले. मेघालयमधील तुरा येथे सेक्स रॅकेट चालवलं जात होतं. पोलिसांकडून कारवाईच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.

मरक यांच्या मालकीच्या फार्महाऊसवर गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. त्याठिकाणी सहा अल्पवयीन बालकं (चार मुलं आणि दोन मुली) आढळून आली, अशी माहिती पश्चिम गारो हिल्स जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विवेकानंद सिंह यांनी पीटीआयला दिली. रिंपू बागान नावाच्या फार्म हाऊसवर अल्पयवीन मुलांना कोंडून ठेवण्यात आलं होतं. बर्नार्ड मरक आणि त्यांचे सहकारी या ठिकाणाहून सेक्स रॅकेट चालवायचे.

फार्महाऊसवरून सुटका करण्यात आलेल्या बालकांचा ताबा जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी घेतला आहे. पोलिसांना छापेमारीदरम्यान दारुच्या ४०० बाटल्या आणि ५०० हून अधिक कंडोम सापडले. या ठिकाणाहून ७३ जणांना अटक करण्यात आली. अवैध कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांवरून त्यांना अटक करण्यात आली आहे. फार्महाऊसवर ३० लहान खोल्या आहेत.
शिवरायांच्या मूर्तीमुळे जाऊ दिले नाही, भाविकाच्या आरोपानंतर तिरुपती देवस्थानने दिले स्पष्टीकरण
फेब्रुवारी २०२२ मध्ये एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाले होते. त्या प्रकरणी गुन्हादेखील दाखल झाला होता. तो गुन्हा मरक यांच्याच फार्महाऊसवर घडला असावा असा संशय पोलिसांना आहे. वेश्या व्यवसाय चालवत असल्याचा आरोप मरक यांनी फेटाळला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्यावरच निशाणा साधला.
स्मृती इराणी अडचणीत; १८ वर्षीय कन्या गोव्यात बार चालवत असल्याचा गंभीर आरोप
मुख्यमंत्री हताश झाले आहेत. भाजपच्या दक्षिण तुरा मतदारसंघात त्यांचा पराभव होणार याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळेच माझ्या फार्महाऊसवर छापा टाकून माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राजकीय सूडभावनेपोटी हा छापा टाकण्यात आला आहे, असा आरोप मरक यांनी केला. मरक यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मेघालयमध्ये एनडीएचं सरकार आहे. संगमा यांचा नॅशनल पीपल्स पक्ष सत्तेतला सर्वात मोठा घटकपक्ष आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : meghalaya: bjp vp bernard n marak in tura was allegedly running brothel says police
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here