इंदापूर : इंदापूर येथील शिवसेना जिल्हा समन्वयकावर शिवसेनेच्याच महिला आघाडीतील पदाधिकाऱ्याने विनयभंगाची तक्रार दिल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर शिवसेना जिल्हा समन्वयक विशाल शिवराम बोंद्रे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, १४ जुलै रोजी इंदापूर येथील पक्ष कार्यालयामध्ये बैठक झाल्यानंतर फोटो काढत असताना शिवसेना जिल्हा समन्वयक विशाल शिवराम बोंद्रे (रा.इंदापूर) यांनी पाठीमागे उभे राहून डाव्या खांद्यावर हात टाकत, माझ्या अंगावरून हात फिरवला आणि लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करत विनयभंग केला, असं पीडितेचं म्हणणं आहे. या तक्रारीची दखल घेत इंदापूर पोलिसांनी कलम ३५४ नुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Aaditya Thackeray: शिवसेनेला आणखी एक धक्का, आता आदित्य ठाकरेही मोदी सरकारच्या रडारवर

शिवसेना नेत्याने आरोप फेटाळले

पक्षातील सहकारी असलेल्या महिलेनेच थेट विनयभंगाचा आरोप केल्यामुळे शिवसेना जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे हे अडचणीत आले आहेत. मात्र बोंद्रे यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. ‘गेली ३५ वर्ष मी समाजकारण करत आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीतून सदर कृत्य करण्यात आलं आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठांनी योग्य ती दखल घेणे आवश्यक आहे. अन्यथा यापुढे कोणावरही अशी वेळ येऊ शकते. हा सर्व प्रकार पक्षासाठी घातक आहे,’ असं म्हणत विशाल बोंद्रे यांनी बाजू मांडली आहे.

गडकरींविरोधात कुभांड आणि ईडीच्या धाडी; शिवसेनेनं केला खळबळजनक दावा

दरम्यान, या घटनेची तालुक्यात जोरदार चर्चा होत असून विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या विशाल बोंद्रे यांच्यावर पोलिसांकडून आगामी काळात नेमकी काय कारवाई केली जाते, हे पाहावं लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here