Aaditya Thackeray | एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभरात शिवसेनेची पडझड रोखण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून अनेक भागांमधील शिवसैनिकांशी संवाद साधला आहे. निष्ठा यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील अनेक वॉर्डातील शिवसेनेच्या कार्यालयांना भेटी दिल्या होत्या. तर मराठवाड्यातील आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा चर्चेचा विषय ठरली होती.

हायलाइट्स:
- आदित्य ठाकरे पर्यावरणमंत्री होते
- पर्यावरणमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांच्या कामकाजाचे बऱ्याचदा कौतुक
- केंद्र सरकारकडून विशेषतः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभाराचे ऑडिट
हा आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पर्यावरणमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांच्या कामकाजाचे बऱ्याचदा कौतुक झाले होते. परंतु, आता केंद्र सरकारने या सगळ्याची समीक्षा केल्यास त्यामधून काय निष्पन्न होणार, ते पाहावे लागेल. केंद्र सरकारकडून विशेषतः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभाराचे ऑडिट केले जाणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मंडळाच्या कारभाराबाबत काही नव्या सूचना, उपाययोजना होणार असतील तर चांगलेच, पण उगाच मंडळ बदनामीचे धनी होऊ नये, अशी अपेक्षा कर्मचारी आणि अधिकारींनी व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्र प्रदूषण मंडळातील कारभाराचे ऑडिट सुरुही केले आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड आदी विभागांतील कार्यालयात हे केंद्रीय ऑडिट सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यालयाबरोबर नागपूर कार्यालयाचा समावेश आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात इतर विभागीय कार्यालयांचेही ऑडिट करण्याबाबत खातेप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत.
आदित्य ठाकरेंचा झंझावती दौरा
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभरात शिवसेनेची पडझड रोखण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून अनेक भागांमधील शिवसैनिकांशी संवाद साधला आहे. निष्ठा यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील अनेक वॉर्डातील शिवसेनेच्या कार्यालयांना भेटी दिल्या होत्या. तर मराठवाड्यातील आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा चर्चेचा विषय ठरली होती. शिवसंवाद यात्रेत नाशिक आणि औरंगाबादमध्ये झालेली आदित्य ठाकरे यांची भाषणं चांगलीच गाजली होती. या सभांमध्ये आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटातील बंडखोरांवर सडकून टीका केली होती. आदित्य ठाकरे यांची बंडखोरांचा उल्लेख वारंवार ‘गद्दार-गद्दार’, असाच केला होता. आदित्य ठाकरे यांच्या सभा आणि रोड शो ला प्रचंड प्रतिसादही मिळाला होता.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network