Shivsena supremo Uddhav Thackeray | ज्यांच्याकडे बहुमत त्यांच्याकडे खरी शिवसेना असेल. सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार आणि १२ खासदार आहे. आणखी तीन खासदार हे शिंदे यांच्यासोबत जाणार आहेत.त्यामुळे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे.निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांना नक्की न्याय मिळेल. धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटालाच मिळेल, असा विश्वास यावेळी आठवले यांनी व्यक्त केला.

हायलाइट्स:
- उद्धव ठाकरे यांच्यासमोर राजकीय अस्तित्त्वाचा प्रश्न
- निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे आदेश
- रामदास आठवलेंचं महत्त्वाचं भाकीत
यावेळी रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भवितव्याविषयी टिप्पणी केली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे पुन्हा उभारी घेतील असे वाटते का, असा प्रश्न रामदास आठवले यांना विचारण्यात आला. त्यावर आठवले यांनी म्हटले की, येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे उभारी घेतील असं वाटत नाही. एकनाथ शिंदे मूळ शिवसेनेत हे होते. ज्यांच्याकडे बहुमत त्यांच्याकडे खरी शिवसेना असेल. सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार आणि १२ खासदार आहे. आणखी तीन खासदार हे शिंदे यांच्यासोबत जाणार आहेत.त्यामुळे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे.निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांना नक्की न्याय मिळेल. धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटालाच मिळेल, असा विश्वास यावेळी आठवले यांनी व्यक्त केला. तसे राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. राष्ट्रपतीपदाच्या शपथविधीनंतर राज्याला नवे मंत्रिमंडळ मिळेल, असेही आठवले यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंनी वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडे मागितली खास भेट
उद्धव ठाकरे यांच्याकडून सध्या शिवसेना पक्ष त्यांच्याच ताब्यात राहावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आठ ऑगस्टपर्यंत शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचे सर्वाधिक समर्थन असल्याबाबतचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रविवारी कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण आवाहन केले होते. ‘वाढदिवसानिमित्त मला भेट द्यायचीच असेल, तर सदस्य नोंदणीच्या अर्जांचे गठ्ठे आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे द्या,’ असे आर्जव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : uddhav thackeray will not be rise again in maharashtra politics says union minister ramdas athawale
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network