ताब्यात घेतलेल्या महिलेकडे पोलिसांनी चौकशी केली असता ती उडवा उडवीची उत्तरे देऊ लागली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या पतीला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आम्ही चिखली येथील माझ्या पत्नीच्या बहिणीच्या शेजारी राहणारी राहणाऱ्या मुलीला पळवून आणलं आहे, अशी कबुली संतोष चौघुले आणि विमल चौघुले या दाम्पत्याने दिली आहे.
नेमकं काय घडलं?
जुन्नर येथील चौघुले दाम्पत्याने पैशांसाठी हे अपहरण केल्याचं उघड झालं आहे. या मुलीचा नरबळी दिल्यास आपण मालामाल होऊ, या हव्यासातून सदर दाम्पत्याने हा कट रचला. हा नरबळी देण्यासाठी चार वर्षांच्या मुलीची आवश्यकता होती. त्यानुसार चिखली येथे राहणाऱ्या विमल चौघुले यांची बहीण सुनीता नलावडे हिला याबाबत कल्पनाही दिली होती. त्यानुसार अशी एक मुलगी असल्याचे तिने विमलला सांगितले आणि त्यानंतर आरोपींनी कट रचून चिमुकलीचे अपहरण केले.
दरम्यान, आपली मुलगी बराच वेळ झाला तरी घरी येईना म्हणून आईने पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या अपहरणकर्त्या बंटी-बबलीला जुन्नर येथून मुलीसह ताब्यात घेतले. अवघ्या १० तासात पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही कामगिरी केल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. याप्रकरणातील आरोपी चौघुले आणि नलवडे कुटुंबातील चौघांना अटक करण्यात आली असून इतर दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.