मुंबई : राज्यात विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातही संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार पुढच्या ३ दिवसांसाठी राज्याला पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, येत्या ३ दिवसांत राज्यात मध्यम ते मुसळधार (Rain Update) पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवाती झालेल्या धुवांधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती ओढावली होती. पण सध्या पूरही ओसरला आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्याने राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

नागपूर सामूहिक आत्महत्या प्रकरण: संगीता यांची झुंज अपयशी, तर मुलाचा मृत्यूशी लढा
खरंतर, देशात एकीकडे कमी पावसामुळे अनेक राज्यात शेतकरी शेती करू शकत नाहीत. खरीप पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे मुसळधार पावसाने महाराष्ट्रात चांगलाच कहर केला आहे. कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलैच्या तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे महाराष्ट्रात आठ लाख हेक्टरवरील उभे पीक उद्ध्वस्त झाले आहे. अशात हवामान खात्याने राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

संपूर्ण आठवड्याचा वेदर रिपोर्ट (Weather Report Weekly )

उत्तर कोकण(North Konkan )- हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २५ ते २८ जुलैपर्यंत उत्तर कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस असणार आहे. यामुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आठवड्याच्या अखेरीस पावसाचा जोर थोडाफार ओसरेल अशी माहिती IMD कडून देण्यात आली आहे.

दक्षिण कोकण आणि गोवा(South Konkan & Goa )- दक्षिण कोकण आणि गोव्यातही २५ ते २८ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्र (North Madhya Maharashtra )- उत्तर मध्य महाराष्ट्रात आज सर्वदूर पावसाचा इशारा देण्यात आला असून आठवडाभर मात्र साधारण पाऊस राहिल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

बैठक संपल्यानंतर माझ्या खांद्यावर हात टाकला; शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याची नेत्याविरोधात विनयभंगाची तक्रार
दक्षिण मध्य महाराष्ट्र(South Madhya Maharashtra )- हवामान खात्याकडून दक्षिण मध्य महाराष्ट्राला आज आणि उद्या पावसाचा इशारा दिला आहे. तर यानंतर आठवडाभर मात्र सामान्य पाऊस राहिल.

मराठवाडा(Marathawada )- मराठवाड्यामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली असून यानंतर २८ जुलैपर्यंत सामान्य पाऊस राहिल.

पूर्व विदर्भ – पश्चिम विदर्भ(East Vidarbha – West Vidarbha )- मुंबई आयमडीकडून पूर्व विदर्भ – पश्चिम विदर्भात २७ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर यानंतर २८ तारखेला तुरळक ठिकाणी पाऊस असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

पुरानं वेढलेल्या गावाची बिकट परिस्थिती; ना पिण्याचं पाणी, ना किराणा; शेतात जातानाही नावेचा प्रवास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here