नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्यावतीनं घेण्यात आलेल्या बी. ए. तृतीय वर्षाच्या राज्यशास्त्र विषयाच्या परीक्षेत विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांमुळे वादंग माजला आहे. परीक्षेत मनुस्मृतीसह छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचा संबंध दर्शवणारे आक्षेपार्ह प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे विद्यापीठानं माफी मागावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली आहे.

 

shivaji maharaj
छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी
नाशिक: नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्यावतीनं घेण्यात आलेल्या बी. ए. तृतीय वर्षाच्या राज्यशास्त्र विषयाच्या परीक्षेत विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांमुळे वादंग माजला आहे. परीक्षेत मनुस्मृतीसह छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचा संबंध दर्शवणारे आक्षेपार्ह प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे विद्यापीठानं माफी मागावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली आहे. याबद्दल अंनिसनं विद्यापीठ प्रशासनानं निवेदन दिलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतिला समर्थ रामदासांनी केलेले योगदान सांगा, मनुस्मृती या ग्रंथाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करा असे आक्षेपार्ह प्रश्न राज्यशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आले होते. विद्यापीठानं परीक्षेत असे प्रश्न विचारणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याच्या तत्त्वाला हरताळ फासण्याचा प्रकार असल्याची टीका अंनिसनं केली आहे.

यशवंतराव चव्हाण यांचं नाव असलेल्या विद्यापीठात संविधानविरोधी अभ्यासक्रमाचा समावेश कसा आणि कोणामार्फत करण्यात आला? छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाली नसल्याचं इतिहास संशोधक आणि उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं जुलै २०१८ च्या निकालात म्हटलं आहे. मग अशा प्रकारे खोटा इतिहास कोण जाणून बुजून शिकवत आहे? असा सवाल निर्माण झाला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : andhashraddha nirmulan samiti demands apology from yashwantrao chavan open university
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here