Mega recruitment in BJP | काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, माजी आमदार-पदाधिकाऱ्यांशी भाजप प्रवेशाची बोलणी सुरू झाली असून पश्चिम महाराष्ट्रात त्यास प्रतिसाद मिळू लागला आहे. तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक नेतेही भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर हेदेखील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. याशिवाय, माढय़ाचे आमदार बबनदादा शिंदे हेदेखील भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते.

हायलाइट्स:
- शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले असले तरी १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित
- भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या राजकारण्यांनी सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे
- निकाल लागल्यानंतर भाजपमध्ये जोरदार ‘इनकमिंग’ सुरु होईल
राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले असले तरी १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असल्याने सरकारचे भवितव्य अनिश्चित आहे. त्यामुळे भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या राजकारण्यांनी सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर भाजपमध्ये जोरदार ‘इनकमिंग’ सुरु होईल, अशी चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, माजी आमदार-पदाधिकाऱ्यांशी भाजप प्रवेशाची बोलणी सुरू झाली असून पश्चिम महाराष्ट्रात त्यास प्रतिसाद मिळू लागला आहे. तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक नेतेही भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर हेदेखील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. याशिवाय, माढय़ाचे आमदार बबनदादा शिंदे हेदेखील भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. आमदार शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांचे खासगी आणि सहकारी साखर कारखानदारीचे मोठे जाळे आहे. त्यामुळे राजन पाटील आणि बबनदादा शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आव्हान निर्माण होऊ शकते. याशिवाय, काँग्रेसचे माजी मंत्री आणि जेष्ठ नेते सिद्धाराम म्हेत्रे हे २०१९ पासूनच भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छूक आहेत. शिंदे-फडणवीस सरकार राज्यात स्थिर झाल्यानंतर भाजपच्या मेगभारतीच्या मोहिमेला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या इतर भागांमध्येही काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नाराज नेते भाजपचे कमळ हातात धरतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : mega recruitment in bjp after power shift in maharashtra politics
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network