बीड : सध्याच्या हायटेकच्या जगात चोरही हायटेक झाल्याचं पाहायला मिळत आहे. वारंवार चोरीच्या घटना समोर येत असताना बीडच्या एका घटनेनं खळबळ उडाली आहे. बीडच्या अंबाजोगाई शहरातून बीडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील टायरच्या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी तब्बल २३ लाख ८३ हजार रुपयांचे टायर आणि ट्यूब चोरून नेले.

या मोठ्या चोरीने शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अंबाजोगाई शहरातील मंगल कार्यालयाच्या समोर प्रवीण बाळासाहेब करपे यांचे वाहनांच्या टायरचे दुकान आहे. रात्रीच्या वेळी दुकान बंद करून ते गावाकडे निघून गेले. त्यानंतर चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचे शटर टामीच्या साह्याने तोडून आत प्रवेश केला.

खळबळजनक! विद्यार्थिनीला शिवीगाळ केल्याच्या रागात शिक्षिकेला नग्न केलं, माथेफिरू शाळेत घुसले आणि…

यानंतर दुकानातील ६५२ टायर आणि ट्यूब व १,७८० स्वतंत्र ट्यूब असा एकूण २३ लाख ८३ हजार ६१ ९ रुपयांचा मुद्देमाल हेऊन चोरटे पसार झाले. सगळ्यात गंभीर म्हणजे दुकानातील सीसीटीव्हीची हार्ड डिस्क देखील चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी प्रवीण करपे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा धाक आहे का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Bus Acciden​t: २ डबल डेकर बसचा भीषण अपघात; ८ प्रवाशांचा जीगाच मृत्यू, ३५ जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here