तीन वर्षांपूर्वी थाटामाटात लग्न झाले. मात्र ‘आता तू चांगली दिसत नाहीस’ असे म्हणत त्रास देत नांदवायला नकार देणाऱ्या पतीसह सासू सासऱ्यावर विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

aur couple
प्रतिकात्मक छायाचित्र
औरंगाबाद : तीन वर्षांपूर्वी थाटामाटात लग्न झाले. मात्र ‘आता तू चांगली दिसत नाहीस’ असे म्हणत त्रास देत नांदवायला नकार देणाऱ्या पतीसह सासू सासऱ्यावर विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर रघुनाथ रवळे असे पतीचे तर वारूबाई रवळे, गोरखनाथ रवळे अशी सासू, सासऱ्यांची नावे आहेत.

तक्रारदार महिलेचे तीन वर्षांपूर्वी औरंगाबाद येथील सिडकोत राहणाऱ्या सुधीर सोबत थाटामाटात लग्न पार पडले होते. सासरकडच्यांनी सुरुवातीला काही वर्षे चांगले नांदवले. मात्र गेल्या काही काळापासून ‘तू चांगली दिसत नाही’ असे म्हणून सुधीर पत्नीला त्रास देत असे. तर सासू-सासरे कामावरून टोमणे मारत मानसिक छळ करत होते.
भाजप उपाध्यक्षाच्या फार्महाऊसवर छापा; सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ५०० कंडोम सापडले, ७३ अटकेत
तुझ्या आई, वडिलांनी लग्नात हुंडा, दागिने दिले नाहीत असे म्हणत सासू त्रास द्यायची. सासरच्यांनी नांदवण्यास नकार दिल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. तसेच मजुरांप्रमाणे शेतात काम करायला लावत होते असेदेखील फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सिडको पोलीस अधिक तपास करत आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : in aurangabad husband denies to stay with wife after 3 years of marriage
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here