Ajit Pawar | जुलै महिन्यात राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे एकूण ८ लाख हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. हे सर्व शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. सोयाबीन, कापूस, भाजपीला आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे.

हायलाइट्स:
- अतिवृष्टीमुळे राज्यात आतापर्यंत १०० हून अधिक जणांचा मृत्यू
- या परिस्थितीत सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा
- जुलै महिन्यात राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला
एकनाथ शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत ३० जून रोजी सरकार स्थापन केले होते. मात्र, सरकार स्थापन होऊन २५ दिवस उलटल्यानंतरही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेले नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच मंत्रिमंडळाचा कारभार हाकत आहेत. त्यामुळे पावसाचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या दुर्लक्षित राहिल्या आहेत. जुलै महिन्यात राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे एकूण ८ लाख हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. हे सर्व शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. सोयाबीन, कापूस, भाजपीला आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथील २ लाख ९७ लाख हेक्टरवरील सोयाबीन आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भात अडीच लाख हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. वर्धा, नागपूर आणि गडचिरोली या भागांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. या सगळ्या नुकसानीचे पंचनामे कधी होणार, याची वाट शेतकरी पाहत आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : ajit pawar demands to declare weight drought in maharashtra to call special assembly session for farmers
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network