रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा करोनामुक्त झाल्याचा आनंद फार काळ टिकू शकलेला नाही. जिल्ह्यात करोना साथीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून करोनाचे एकाचवेळी १३ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे. दरम्यान, या सर्व रुग्णांचं रेड झोन मुंबईशी कनेक्शन असल्याने चिंता वाढली आहे.

रत्नागिरीच्या ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातून तपासणीसाठी स्वॅब पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी सायंकाळी प्राप्त झाला असून मंडणगडमधील ११ जण तर कळंबणी भागातील २ जणांना करोनाची लागण झाल्याचे त्यात स्पष्ट झाले.

मंडणगड येथे ११ जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या सर्व अकरा जणांचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. यातील ९ जण पंदेरी या गावातील असून एक म्हाप्रळ व एक पालवणी गावातील आहे. या सर्वांना करोनाची लागण झाली आहे. कळंबणी अंतर्गत जे २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यांना लवेल येथे क्वारंटाइन करण्यात आले होते. या दोघांचाही मुंबई प्रवासाचा इतिहास असून दोघेही करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनाबाधित रुग्णांच्या मुंबई कनेक्शनने जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here