अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका बापानं पोटच्या मुलाची निर्घृण हत्या केली. मुलगा व्यसनाच्या आहारी गेल्यानं वडिलांनी त्याला संपवलं. धारदार शस्त्राच्या मदतीनं वडिलांनी २१ वर्षीय मुलाचा खून केला. यानंतर ग्राइंडरच्या मदतीनं वडिलांनी मुलाच्या मृतदेहाचे तुकडे केले. मृतदेहाचं शिर, हात आणि पाय वडिलांनी वेगळे केले.

मुलाचा मृतदेह कोणाच्या हाती लागू नये, त्याची ओळख पटू नये यासाठी वडिलांनी मृतदेहाचे तुकडे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. काही अवयव सापडल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. हे अवयव एकाच व्यक्तीचे असल्याची माहिती तपासातून उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी वडील निलेश जोशी यांना अटक केली. त्यावेळी ते पळण्याच्या प्रयत्नात होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० आणि २१ जुलैला अहमदाबादच्या एकाच परिसरातील दोन ठिकाणी काही अवयव सापडले. शिर, हात आणि पाय पोलिसांना वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले. पोलिसांनी अवयव ताब्यात घेऊन तपास सुरू केला. सर्व अवयव तपासणीसाठी पाठवण्यात आले. हे सगळे अवयव एकाच व्यक्तीचे असल्याची माहिती अहवालातून समोर आली. त्यानंतर तपासाची चक्रं वेगानं फिरली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांचा संशय मृताच्या वडिलांवर होता.
आधी अफेअर, मग ५ लाखांची मागणी; नकार देताच व्यावसायिकाचं अपहरण; कपडे फाडून, लुटून सोडलं
आरोपी देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याला नेपाळला जायचं होतं. त्यासाठी तो २२ जुलैला अहमदाबादहून सूरतला जाणाऱ्या बसमधून निघाला. पुढे तो गोरखपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसला. याची माहिती पोलिसांना मिळाली. राजस्थानच्या गंगानगर रेल्वे स्थानकात पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीनं आरोपीला अटक केली.
फ्लॅट भाड्यानं घेतला, गर्लफ्रेंड्सना घेऊन गेले; लिपलॉक चॅलेंजनंतर घडलं असं काही…
मुलगा दारू आणि अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याची हत्या केल्याचं आरोपी वडिलांनी पोलिसांना सांगितलं. मुलगा रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वाद घालायचा, मारहाण करायचा. १८ जुलैला मुलानं दारू पिऊन वडिलांना शिवीगाळ केली, त्यांना मारहाण केली. यावेळी आरोपीनं मुलाला धक्का दिला आणि त्याच्या डोक्यावर सहा-सातवेळा दगडानं वार केले. त्यानंतर मुलाचा जागीच मृत्यू झाला. मुलाचा मृतदेह कोणाच्या हाती लागू नये म्हणून आरोपीनं त्याच्या शरीराचे तुकडे केले आणि ते शहरात विविध ठिकाणी फेकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here