आजच्या या घटनेतही ही इको कार त्याचप्रकारे आधी दुचाकीला धडकली त्यानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबाला धडकून पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की विजेचा खांबही कोसळून पडला. यात इको कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेचा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल.
पाहा या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ –
हेही वाचा-Bus Accident: २ डबल डेकर बसचा भीषण अपघात; ८ प्रवाशांचा जीगाच मृत्यू, ३५ जखमी
पालघर येथील चाणक्य इंग्लिश स्कूल या शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या इको कारने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. पालघर-सातपाटी मार्गावर चुनाभट्टी येथील सोहेल इंम्पेक्स कंपनीसमोर हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वार दुचाकीसह रस्त्यावरून दूरवर फेकला गेला. तर त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना घेऊन जात असलेली इको कार देखील रस्त्याच्या कडेला उलटली.

पालघर – सातपाटी मार्गावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या इको कार-दुचाकीचा अपघात
हेही वाचा-शिरुरमध्ये भीषण अपघात! रुग्णवाहिकेची टोलनाक्याला जोरदार धडक; आतली माणसं बाहेर फेकली गेली
या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. चेतन मेहेर असे अपघातातील मृतकाचे नाव आहे. दरम्यान, रिक्षात असलेले नऊ विद्यार्थी देखील किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला.
हेही वाचा-एसटीचं अपघात सत्र सुरुच, सोलापूरमध्ये मोठी दुर्घटना, ३५ हून अधिक जखमी,मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
तरुणाची दुचाकी हरवली, शोधाशोध केल्यावर विहिरीत सापडली