Aarey metro car Shed | हे काम सुरु असताना आरे परिसरातील वाहतूक २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती. आरे परिसरातून धावणाऱ्या बेस्ट बसचे मार्गही वळविण्यात आले होते. झाडांची छाटणी सुरु असताना कोणालाही याठिकाणी प्रवेश नव्हता. ही बातमी समजल्यावर अनेक पर्यावरणप्रेमींना आरे परिसरात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी या सगळ्यांना रोखून धरले होते.

हायलाइट्स:
- काम पुन्हा ठप्प होण्यापूर्वीच ते पूर्ण करून टाकायचे, असा चंग सरकारने बांधलेला दिसत आहे
- सोमवारी आरे परिसरात मेट्रो कारशेड असलेल्या भागात काही झाडे तोडण्यात आली
- पर्यावरणप्रेमी पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसले
‘मेट्रो ३’साठीचे (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) दोन डबे लवकरच मुंबईत दाखल होणार आहेत. हे दोन्ही डबे मरोळ-मरोशी येथील तात्पुरत्या कारशेडमध्ये नेण्यात येणार आहेत. हे डबे नेण्यासाठी मोकळा रस्ता असावा या उद्देशाने आरेतील झाडांवर सोमवारी पुन्हा कुऱ्डाड चालवण्यात आली. आंध्र प्रदेशमधील श्रीसिटी येथील कारखान्यातून मेट्रो ट्रेनचे हे डबे सात ते आठ दिवसांपूर्वी मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. लवकरच मेट्रोचे हे डबे मुंबईत पोहोचतील. हे डबे मरोळ-मरोशी येथील तात्पुरत्या कारशेडमध्ये ठेवण्यासाठी नेले जात असताना ट्रेलरचा वापर केला जाणार आहे. रस्त्यांवरील झाडांचा डब्यांना अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आज आरे परिसरातील झाडे कापण्यात आली.
हे काम सुरु असताना आरे परिसरातील वाहतूक २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती. आरे परिसरातून धावणाऱ्या बेस्ट बसचे मार्गही वळविण्यात आले होते. झाडांची छाटणी सुरु असताना कोणालाही याठिकाणी प्रवेश नव्हता. ही बातमी समजल्यावर अनेक पर्यावरणप्रेमींना आरे परिसरात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी या सगळ्यांना रोखून धरले होते.
मेट्रो कारशेडवरून राजकारण रंगण्याची शक्यता
आरे परिसरात असलेल्या जंगलामुळे याठिकाणी मेट्रो प्रकल्पाची कारशेड (Aarey Car shed) उभारण्याला विरोध करण्यात आला होता. मात्र, फडणवीस सरकारच्या काळात रातोरात झाडे कापून या प्रकल्पाचे काम पुढे रेटण्यात आले होते. परंतु, ठाकरे सरकारने सूत्रे हाती घेतल्यानंतर आरेतील मेट्रोच्या कारशेडचे काम थांबवण्यात आले होते. त्याऐवजी पर्यायी जागेचा शोध सुरु झाला होता. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने राज्याची सूत्रे हाती घेताच हा निर्णय फिरवण्यात आला होता.
“नको हा खोटा विकास, मुंबई होईल भकास..” आरेसाठी तरुणांची मेट्रोत गाणं गात जनजागृती
बई मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडांच्या कत्तलीनंतर वादग्रस्त ठरलेल्या मुंबई मेट्रो रेल्वेच्या तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे यांची उद्धव ठाकरेंनी सत्तेत येताच उचलबांगडी केली होती. आता नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने मात्र मेट्रोपेक्षा सुपरफास्ट निर्णय घेत अश्विनी भिडे यांच्यावर पुन्हा मुंबई मेट्रोची धुरा सोपवली आहे. आता नवीन वाद निर्माण होऊन तो चिघळण्यापूर्वीच आरेतील मेट्रो कारशेडचे काम शक्य तितक्या जलद गतीने पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network