MLA Yashomati Thakur Viral Video : यशोमती ठाकूर यांचा सरकारी अधिकाऱ्यांना दम दिल्याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. तिवसा तालुक्यातील एका रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना यशोमती ठाकूर यांनी हा इशारा दिला आहे.

हायलाइट्स:
- चांगल्या दर्जाचे काम केले नाही, तर डोके फोडेन
- आमदार यशोमती ठाकूर यांनी दिला अधिकाऱ्यांना दम
- तिवसा तालुक्यातील रस्त्याच्या भूमिपूजनावेळी घडला हा प्रसंग
तिवसा तालुक्यातील एका रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना यशोमती ठाकूर यांनी हा इशारा दिला आहे. रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आटोपल्यावर यशोमती ठाकूर या संबंधित रस्त्याचे काम कुणाकडे आहे, असं विचारणा केली असता तेव्हा एक अधिकारी कनिष्ठ अभियंता म्हणून आपली ओळख सांगतो आणि हे काम आपल्याकडे आहे, असं सांगतो. त्याचवेळी अधिकाऱ्यांना उद्देशून यशोमती ठाकूर या रस्त्याच्या दर्जाच्या बाबतीत तडजोड स्वीकारली जाणार नाही, असं सांगतात. ‘मी एक रूपयाही घेत नाही, तुमच्याकडून क्वालिटीचे काम झाले नाही तर डोकं फोडीन लक्षात ठेवा’, असा इशारा त्या यावेळी देताना दिसत आहेत.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : work do a good job footage mla yashomati thakur viral video
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network