कल्याण : कल्याण येथील एका विश्रांती गृहात छापा मारून महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा सोमवारी जप्त करत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. करण रजक (रा. पत्रीपूल), सुरत पुजारी (रा. पत्रीपूल), मोहम्मद आरिफ (रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करण हा पत्री पुलाजवळ राहतो आणि तो रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतो. तर सुरज हा रेल्वे स्थानक भागात हमालाचे काम करतो आणि काही दिवस मोहम्मद पत्रीपूल भागात राहत होता. त्याची करण, सुरजशी ओळख झाली होती. या तीन जणांचा मुख्य सूत्रधार दिल्लीत आहे. तो या बनावट नोटा वितरित करण्याचे काम करतो, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. खळबळजनक! विद्यार्थिनीला शिवीगाळ केल्याच्या रागात शिक्षिकेला नग्न केलं, माथेफिरू शाळेत घुसले आणि… भारतीय चलानातील २०० रुपयांच्या दोन लाख रुपयांच्या नोटा छाप्यातून पोलिसांनी जप्त केल्या आहेत. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांना कल्याण पश्चिमेतील एका विश्रांती गृहात एका खोलीत तीन जण थांबले आहेत. ते बनावट नोटांचा व्यवहार करण्यासाठी आले आहेत, अशी गुप्त माहिती मिळाली होती.
महाराष्ट्र हादरला! सख्ख्या भावाकडून लहान बहिणीचे शोषण, सहा महिन्याची गर्भवती राहिली अन्… पोलिसांनी त्वरित विश्रांती गृहाभोवती सापळा लावला. जेणेकरून आरोपी पळून जाता कामा नये. साध्या वेशातील एक पोलीस आरोपी बसलेल्या खोलीत पाठविण्यात आला. त्याने तीन जणांना ‘तुम्ही येथे काय करता’ अशी विचारणा केली. त्यावेळी तीन जण घाबरले. ते उलट सुलट उत्तरे देऊ लागले. त्यांनी खोलीतून पळण्याची तयारी सुरू केली. पोलिसाने वरिष्ठांना इशारा करताच एकावेळी शोध पथक खोलीत शिरले आणि तीन जणांना ताब्यात घेतले. खोलीतील सर्व वस्तू ताब्यात घेण्यात आल्या.
पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली असता, पोलिसांना त्यांच्या जवळ भारतीय चलनी व्यवहारातील दोन लाख रुपयांच्या दोनशे रुपयांच्या नोटा आढळल्या आहेत. दरम्यान, बनावट नोटा विविध प्रकारच्या दुकानांमध्ये जाऊन वस्तू खरेदीच्या माध्यमांतून वटविल्या जात होत्या, अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.