Authored by Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jul 25, 2022, 8:07 PM

Aurangabad teacher attacked the headmistress : औरंगाबादमध्ये एका शाळेत पालकसभेत मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापिकेवर त्याच संस्थेतील एका शिक्षकाने व्यासपीठावर चढून हल्ला केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संशयित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

The teacher attacked the headmistress in the parent meeting Aurangabad Crime News (1)
पालकांसमोर शिक्षकाचा राडा, मुख्याध्यापिकेच्या मार्गदर्शानावेळी स्टेजवर चढला, अन्…

हायलाइट्स:

  • पालकसभेत मुख्याध्यापिकेवर शाळेतल्या शिक्षकाचा हल्ला
  • औरंगाबादमधील प्रतिभाताई पाटील शाळेतील घटना
औरंगाबाद : पालकसभेत मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापिकेवर त्याच संस्थेतील एका शिक्षकाने व्यासपीठावर चढून हल्ला केला. त्यांच्या हातातील माईक हिसकावून शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच मध्यस्थी करणाऱ्या पालक आणि मुख्याध्यापिकेच्या शिक्षक मुलीलाही शिवीगाळ केल्याची घटना हर्सूल टी-पॉइंट येथील प्रतिभाताई पाटील शाळेत घडली.

याप्रकरणी, देवेंद्र राजेंद्र पाटील या शिक्षकाविरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैजियंती लक्ष्मण मिसाळ असं जखमी मुख्याध्यापिकेचं नाव आहे. मुलगी सुनंदा लक्ष्मण मिसाळ (रा. भगतसिंगनगर,हर्सूल) यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवेंद्र पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापिका मिसाळ यांनी शाळेत पालकसभा बोलावली होती. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्या शाळेत पालकसभेत उपस्थित पालकांना मार्गदर्शन करीत असताना आरोपी देवेंद्र पाटील तेथे हे शिक्षक त्याने काही विचारपूस न करता थेट व्यासपीठावर जाऊन मुख्याध्यापिका मिसाळ यांना शिवीगाळ सुरू केली.

सत्तेचा ताम्रपट घेऊन आलाय का? २०२१ च्या कामांच्या स्थगितीवरुन अजित पवार संतप्त
त्यानंतर त्यांच्याशी उज्जत घालून माईक हिसकावला तुम्ही पालकसभा घ्यायची नाही असं म्हणत व्यासपीठावरच धिंगाणा घातला. त्या समजावून सांगत असताना त्यांनी मिसाळ यांना धक्काबुक्की केली. तेव्हा पालकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तुमचा काही संबंध नाही. म्हणत अश्लील शिवीगाळ केली. हा प्रकार सुनंदा मिसाळ यांना समजल्यावर त्या तात्काळ तिथे गेल्या त्यांनी आईला बाजूला नेले. आरोपी देवेंद्र पाटीलला याचा जाब विचारला तेव्हा त्याने सुनंदा यांनाही शिवीगाळ करून धमकावले आरोपी शिक्षक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने मिसाळ यांनी थेट सिटी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. पुढील तपास उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड हे करत आहेत.

WWE चा रिंकू सिंग पडलाय प्रेमात, सारासोबतचे फोटो जगभरात व्हायरल

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : pratibhatai patil school the teacher attacked the headmistress in the parent meeting aurangabad crime news
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here