Authored by Edited by सुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jul 26, 2022, 12:11 AM

API suspended : नागपुरातील रामटेक पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला आमदार आशीष जयस्वाल यांच्याशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. विवेक सोनवणे असे निलंबित करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी ही कारवाई केली. सोनवणे यांची ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

 

an assistant police inspector has been suspended for misbehaving with mla
आमदाराशी असभ्य वर्तन करणे भोवले, सहाय्यक पोलीस निरीक्षकावर झाली कारवाई
नागपूर : आमदार आशीष जयस्वाल (MLA Ashish Jaiswal) यांच्याशी असभ्य वर्तन करणे रामटेक पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला भोवले. पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत एपीआयला निलंबित (API suspended) केले. विवेक सोनवणे,असे निलंबित अधिकाऱ्याचे नाव आहे. (an assistant police inspector has been suspended for misbehaving with mla)

सपन जयस्वाल यांचा रामटेकमध्ये पेट्रोल पंप आहे. १९ जुलैला रात्री ११ वाजताच्या सुमारास मोटारसायकलवर दोन युवक आले. तोपर्यंत पंप बंद झाला. कर्मचाऱ्यांनी त्यांना पेट्रोल पंप बंद झाल्याचे सांगितले. दोघांनी पेट्रोल पंपावर दगडफेक केली. कर्मचाऱ्यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. दोघांनी शिवीगाळ केली. एका कर्मचाऱ्याने युवकाला थापड मारली. त्यानंतर दोन युवक, सपन व त्यांचे कर्मचारी रामटेक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला आले.

क्लिक करा आणि वाचा- रेशनकार्डवरील धान्य ऑनलाइन तपासणे आता सहज शक्य; संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

सावनवणे यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. माहिती मिळताच आमदार जयस्वालही पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. सोनवणे यांनी आ.जयस्वाल यांच्यासोबत असभ्य वर्तण केले. जयस्वाल यांनी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्याकडे तक्रार केली.

क्लिक करा आणि वाचा- नागपूर सामूहिक आत्महत्या प्रकरण: संगीता यांची झुंज अपयशी, तर मुलाचा मृत्यूशी लढा

मगर यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देत सोनवणे यांची ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्षात बदली केली. चौकशीत दोषी आढळल्यानंतर सोनवणे यांना निलंबित करण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा- एएसआयने घेतला गळफास;ग्रामीण मुख्यालयातील घटनेने खळबळ

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : an assistant police inspector has been suspended for misbehaving with mla
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here