मुंबई : शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. ही मुलाखत दोन भागात प्रदर्शित होणार आहे. मुलाखतीच्या पहिल्या भागात उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केलीय. शिवसेनेसोबत २०१४ मध्ये भाजपनं तोडलेल्या युतीचा मुद्दा उद्धव ठाकरेंनी उचलून धरला. संजय राऊत यांनी शिवसेनेला सातत्यानं विरोधाचं राजकारण का सहन करावं लागतं, या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी आम्ही ज्यांच्यावर जबाबदारी देतो त्यांच्यावर विश्वास ठेवतो. कदाचित अतिविश्वास हा गुन्हा ठरत असेल. मात्र, शिवसेनेच्या नावानं ज्यांना बोंबा मारायची आहे. त्यांना मारू देते. महाराष्ट्रात घडलेले सत्तानाट्य राज्यातील शिवसेना संपवण्यासाठी करण्यात आलं आहे. शिवसेना आणि ठाकरेंचं नात तोडण्याचा प्रयत्न केला जातोय.तुम्ही आज ज्या संघर्षमय कालखंडातून जाताय त्याची अपेक्षा केली होती?, असा सवाल संजय राऊत यांनी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना आणि संघर्ष पाचवीला पुजलं आहे. मागे मला कोणतरी म्हटलं होतं. मला त्याचा वारंवार अनुभव येतोय. शिवसेना एक तळपती तलवार आहे. म्यानेत ठेवल्यास ती गंजते. त्यामुळं ती तळपलीच पाहिजे. तलवार तळपण म्हणजे संघर्ष आला, असं उद्धव ठाकरे म्हणाले..

संजय राऊत : शिवसेनेच्या विरोधात विश्वासघाताचं राजकारण वारंवार का होतं?

उद्धव ठाकरे : आम्ही पक्ष हा व्यावसायिकपणे चालवत नाही. तुम्ही सुद्धा गेली अनेक वर्ष शिवसेना अनुभवत आहात, तुम्हीपण शिवसैनिक आहात. पण एक परिवार म्हणून बघत आलो आहे. बाळासाहेबांनी आणि माँनी शिकवलं, एकदा आपलं म्हटल्यावर आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवतो, कदाचित जो राजकारणातील गुन्हा किंवा चूक असेल आमच्याकडून वारंवार होते. एखाद्यावर आम्ही विश्वास टाकला की अंधविश्वास टाकतो.पूर्ण जबाबदारी त्याला ताकद देणं असेल, शक्ती देणं असेल. आता आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून जे आवई उठवत आहेत, बोंब मारत आहेत त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे. २०१४ मध्ये भाजपनं युती तोडली होती तेव्हा आपण काय सोडलं होतं, काहीच सोडलं नव्हतं आपण आजही काही सोडलं नव्हतं. तेव्हा मधला काळ आला होता तेव्हा शिवसेनेकडं विरोधीपक्ष नेतेपद आलं होतं. अनेकांना शिवसेना संपेल असं वाटलं होतं, मात्र शिवसेना एकटी लढली आणि ६३ आमदार निवडून आले होते, त्याकाळात विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी तेव्हा मी पद कुणाला दिलं होतं. आतासुद्धा भाजपनं जे केलं आहे ते माझ्याशी बोलणी झाल्याप्रमाणं आता केलं. हे बोलणी केल्याप्रमाणं तेव्हा केलं असतं तर सन्मानानं झालं असतं. देशभर पर्यटन करण्याची गरज लागली नसती.

आणि असं मी ऐकलं, अस मी वाचलं, माझ्याकडे माहिती नाही. हजारो कोटी रुपये खर्च केले गेले. हॉटेलचा खर्च, विमानाचा खर्च आणि अतिरिक्त खर्च, खोक्यात काय दडलंय हे घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला माहिती असेल. पण हे फुकटात झालं असतं आणि सन्मानानं झालं असतं. हेच तर मी सागंत होतं.

मी बरा होऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात बुडवले, तेच पक्ष बुडवायला निघालेत, एकनाथ शिंदेंवर ठाकरी आसूड
संजय राऊत : मग हे का घडवलं?

उद्धव ठाकरे : कारण त्यांना शिवसेना संपवायची आहे. जे शिवसेनेबरोबर ठरवलं होतं अडीच-अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद हेच तर तुम्ही आता केलं. ते जर तुम्ही केलं असतं तर निदान भाजपला पाच वर्षात एकदा मुख्यमंत्रिपद मिळालं असतं. ते जे म्हणत आहेत ती शिवसेना नाही. हे सगळं तोडफोड करुन त्यांचं समाधान होत नाही. यांचा वापर करुन त्यांना शिवसेना संपवायची आहे. यांचा वापर करुन त्यांना शिवसेना संपवायची आहे.

संजय राऊत : शिवसेना का संपवायची आहे? ५६ वर्षात सेना संपवण्याचे प्रयत्न अनेकांनी केले

उद्धव ठाकरे : अनेकदा शिवसेना संपवण्याचे प्रयत्न झाले. प्रत्येकवेळा शिवसेना जोमानं आणि तेजानं उभी राहिली आहे. आता सुद्धा त्यांना हिंदुत्वात भागीदार नको असेल. शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वासाठी ते मजबूत होण्यासाठी राजकारण केलं. आपल्याला जे प्रश्न विचारत आहेत त्यांनी राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर केला


संजय राऊत : तुम्ही महाविकास आघाडी स्थापन केल्यानं हिंदुत्व संकटात आल्याची आवई उठवली जाते

उद्धव ठाकरे : मला एक प्रसंग सांगा किंवा माझ्या हातून घडलेली एक गोष्ट दाखवा त्यामुळं हिंदुत्व धोक्यात आलं असेल. असा एक निर्णय दाखवा तुम्ही नुकतेच अयोध्येला गेला होतात. अयोध्येत महाराष्ट्र भवन निर्माण करत आहोत. मी अयोध्येला गेलो होतो, मुख्यमंत्री झाल्यानंतर अयोध्येला गेलो होतो. नव्या मुंबईत तिरुपती मंदिराला जागा दिली होती. जुन्या आणि पुरातन मंदिरांचं जतन आणि संवर्धन आपण सुरु केलं. गडकिल्ल्यांचं आपण सुरु केलं. हिंदुत्वापासून दूर गेलो नाही अशा अनेक गोष्टी सांगता येतील.

धीरोदात्त ठाकरे आक्रमक, भाषणाने चिमुरड्यामध्ये उत्साह, उद्धव ठाकरेंची साद-चिमुकल्याचा प्रतिसाद
संजय राऊत : तुम्ही आज ज्या संघर्षमय कालखंडातून जाताय त्याची अपेक्षा केली होती?

उद्धव ठाकरे :
शिवसेना आणि संघर्ष पाचवीला पुजलं आहे. मागे मला कोणतरी म्हटलं होतं. मला त्याचा वारंवार अनुभव येतोय. शिवसेना एक तळपती तलवार आहे. म्यानेत ठेवल्यास ती गंजते. त्यामुळं ती तळपलीच पाहिजे. तलवार तळपण म्हणजे संघर्ष आलाच. अर्थात याचा अर्थ अर्थी घेऊ नये, की तलवारीनं वार करा असं माझं म्हणनं नाही, ही एक उपमा आहे. संघर्षासाठीच तर शिवसेना जन्माला आली. भूमिपुत्रासाठी मराठी माणसासाठी त्याच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला. त्याच्यानंतर शिवसेना हिंदुत्वासाठी लढली. मग ते १९९२-९३ असेल अनेक ठिकाणी शिवसेना लढली. शिवसेना म्हणजे संघर्ष, जिथे अन्याय तिथे वार हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहे.
रत्नागिरीत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; वीसही नगरसेवकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here