संजय राऊत : ज्या ठाण्यानं शिवसेनेला पहिली ताकद दिली, बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचं एक भावनिक नातं होतं. पहिला भगवा झेंडा ठाण्यात फडकला. बाळासाहेब त्यांच्या आयुष्यात ठाण्यानं सत्ता दिली असं अभिमानानं सांगत राहिले. त्याच ठाण्यातून शिवसेनेला आव्हान उभं राहिलं.
उद्धव ठाकरे : ठाणेकर सुज्ञ आहेत. हा जो पालापाचोळा आहे ते ठाणेकर नाहीत. ठाणेकर आणि ठाणेकर नागरिक , ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचं ठाणं हे नातं पालापाचोळ्याला तोडता येणार नाही. ठाणे, मुंबई आणि महाराष्ट्राची जनता निवडणुकीची वाट पाहत आहे. याच्यापुढे असा एक कायदा झाला पाहिजे. ज्यांना कुणाला युती करायची असेल, आघाडी करायची असेल, कडबोळं करायचं असेल त्याचा करार मदार काय झाला आहे जनतेसमोर ठेवा. जागावाटप किती होणार आहे. कोणत्या धोरणावर तुम्ही युती करणार आहात हे पुढं करा. एक तर जे माझं आणि भाजपचं जे ठरलं होतं, ते आधी नाकारुन त्यांनी आता त्यांनी केलं ते जनतेसमोर उघडपणानं आलं असतं. त्यामुळं निवडणुकीनंतर मला जे काय करावं लागलं. महाविकास आघाडीचा जन्म झाला नसता. महाविकास आघाडीचा जन्म आम्ही दिला. मी शपथ घेतली ती शिवतिर्थावर घेतली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आणि बाळासाहेबांचं स्मारक तिकडे आहे त्याच्या साक्षीनं शपथ घेतली होती. शिवाजी पार्क भगवं पूर्ण फुलून गेलं होतं. लोक नाराज असते तर तिकडे कोण आलं नसतं. तरी माझं मत असं आहे की आता निवडणुका घ्या. जर आम्ही महाविकास आघाडी स्थापन करुन चूक केली असेल तर लोकं आम्हाला घरी बसवतील. आणि जर भाजपनं माझ्याशी नाही म्हटलं तरी महाराष्ट्राची जनता मला ओळखते, आमची सहावी पिढी राज्यासाठी काम करते, त्याच्या आधीच्या पिढ्या होत्या. एकतर लोक त्यांना घरी बसवतील जो करार त्यांनी केला होता तो मोडला म्हणून किंवा नाहीतर आम्ही पाप केलं म्हणून आम्हाला घरी बसवतील.
होऊद्या जनतेच्या कोर्टात फैसला माझी तयारी आहे.
संजय राऊत : पण या सगळ्या कालखंडामध्ये कधी नव्हे तो अघोरी प्रयत्न होतं आहे.तो महाराष्ट्रात कधीच झाला नव्हता. तो म्हणजे कोणीतरी शिवसेना संपूर्ण शिवसेना हायजॅक करण्याचा प्रयत्न करतंय
उद्धव ठाकरे : कारण त्यांना पर्याय नाही, हे नीट लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. एक बारकावा लक्षात घ्या. मी कायदेतज्ज्ञांशी बोलून समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यातून सांगतो. पूर्वी दोन तृतीयांश ही सदस्यसंख्या झाली की वेगळा गट स्थापन करता येत होता. आता तो कायदा गेला. आता हे जे बाजूला झाले भले दोन तृतियांश असतील किंवा आणखी काही असतील मात्र त्यांना वेगळा गट स्थापन करता येत नाही हे कायदेतज्ज्ञांनी सांगितलं आहे. मी कायदा लिहिलेला नाही कायदा वाचलेला नाही. घटनातज्ज्ञांनी ज्यांनी त्याचा अभ्यास केलाय त्यांची मतं ऐकून आणि त्यांच्याशी बोलून सांगतो. म्हणजेच काय या गटाला कुठल्यातरी पक्षात विसर्जित व्हावं लागेल. म्हणजेच काय त्यांना भाजपमध्ये जावं लागेल, नाहीतर दुसरे सपा आहेत, एमआयएम आहे , इतर छोटे छोटे पक्ष आहेत त्यामध्ये जावं लागेल. आणि हे जर कुठल्या पक्षात गेले तर भाजपला यांचा जो उपयोग करुन घ्यायचा हे ते संपेल. त्यांची ओळख त्यांना भाजपमध्ये गेलो, समाजवादी पक्षात गेलो, बच्चू कडूंचा पक्ष आहे त्यात गेलो असं सांगाव लागेल. म्हणून ते आम्ही म्हणजेच शिवसेना असा भ्रम निर्माण करत आहेत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
मधल्या काळात क्लिप फिरली बघा, असं माझ्या काळात झालं नव्हतं. माझ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बसायचे पण त्यांनी माईक खेचला नव्हता. काही वेळा अर्थसंकल्प याविषयी अधिक माहिती असल्यानं त्यांना तुम्ही माहिती द्या, असं सांगायचो. माझ्याकडून कुणी माईक खेचला नाही. आमच्या महाविकास आघाडीत एक सभ्यता होती आणि समन्वय होता. असो त्यावरती नंतर बोलयाचं असल्यास बोलेन. त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री बोलले हे म्हणजेच शिवसेना म्हणजेच त्यांचा डाव असा आहे की शिवसेनिकांमध्येच लढाई लावायची. शिवसेना खतम करायची एकदा का काम संपलं की पालापाचोळा तुम्ही जे मघाशी म्हणालात तो टोपलीत भरला की नेऊन टाकायचा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.