हाजीपूर: बिहारच्या हाजीपूरमध्ये एका पेट्रोल पंपवर चक्रावून टाकणारा प्रकार घडला आहे. रात्रीच्या वेळी फारशी गर्दी नसलेल्या एका पेट्रोल पंपवर अजब चोरी झाली आहे. ही संपूर्ण चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पेट्रोल पंपवर टाकी भरून एक जण पैसे न देताच निघून गेला. पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यानं कार रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात तो अपयशी ठरला.

रात्रीच्या अंधारात हाजीपूरच्या विविध भागांत असलेल्या पेट्रोल पंपवर एक चोर पैसे न भरताच पेट्रोल भरत असल्याचे प्रकार घडले. टाकी पूर्ण भरायची आणि पैसे न भरताच कार घेऊन पसार व्हायचं, अशी चोरट्याची कार्यपद्धती होती. हा प्रकार जिल्ह्यातील पेट्रोल असोसिएशनपर्यंत पोहोचला. पंप मालकांनी जिल्हा पोलिसांकडे केली. यानंतर पोलिसांनी पेट्रोल पंपांवर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले. पोलिसांनी कारचा ठावठिकाणा शोधून काढला आणि चोरट्याला बेड्या ठोकल्या.
बलात्काराच्या खोट्या आरोपात २० वर्षे तुरुंगात; सुटल्यावर लग्न केलं; दुसऱ्याच दिवशी आक्रित घडलं
पैसे न देताच पेट्रोल भरून निघून जाणारा चोर चांगल्या कुटुंबातील आहे. चोराच्या कुटुंबाचं उत्पन्न लाखाच्या घरात आहे. मात्र आरोपीला महागड्या कारमध्ये पेट्रोल टाकून मौजमजेसाठी फिरणं अवघड जात होतं. त्यामुळे चांगल्या कुटुंबातील मुलगा चोर बनला. पोलिसांकडे या चोरट्याच्या अनेक तक्रारी आल्या. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासलं आणि चोरट्याला अटक केली.
आधी अफेअर, मग ५ लाखांची मागणी; नकार देताच व्यावसायिकाचं अपहरण; कपडे फाडून, लुटून सोडलं
एक तरुण गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल पंपवर येऊन पेट्रोल भरायचा आणि पैसे न देताच निघून जायचा. यामुळे अनेक पेट्रोल पंपचे मालक चिंतेत होते, असं पेट्रोल पंप मालक राजन कुमार यांनी सांगितलं. रात्री १२ ते पहाटे ४ च्या दरम्यान तरुण फुकट पेट्रोल भरायचा. मुझफ्फरपूरचे जवळपास सगळेच पेट्रोल मालक एका तरुणामुळे त्रस्त होते, असं कुमार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here