पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात वरवे गावात एक महसूल कर्मचारी तलावात पोहत असताना दम लागल्याने त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुकुंद त्र्यंबक चिरके ( वय 35 ) असे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. मी पोहत जाऊन दुसऱ्या बाजूला जाऊन येतो असे सांगून ते गेले तर परत आलेच नाही. सगळ्यात गंभीर म्हणजे ते पोहण्यात पटाईत होते, अशी माहिती आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुकुंद चिरके हे मित्रांसमवेत दररोज या तलावात पोहण्यासाठी जात होते. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास ते आपल्या दोन मित्रांसोबत पोहण्यासाठी गेले. मी पोहत जाऊन पलीकडच्या किनाऱ्यावर जाऊन येतो असे म्हणत ते निघाले. मात्र, पाण्याच्या मध्यभागी गेल्यावर त्यांना दम लागला. त्यांनी मित्रांना वाचवण्यासाठी हाताने इशारा देखील केला. मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी किनाऱ्यावरील होडी घेऊन तिथे जाण्याचा प्रयत्न केला. आम्ही येत आहोत, घाबरू नका, असे मित्रांनी त्यांना आधार देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत चिरके पाण्यात बुडाले होते. मित्रांचे प्रयत्न त्यांना वाचवण्यासाठी अपुरे ठरले.

जादूटोण्याच्या संशयातून तरुणाला नदीत फेकले; १२ गावांत शोध घेतला पण…
घटनेची माहिती मिळताच भोर येथील भोईजल संघच्या पथकाने पाण्यात उतरून शोधमोहीम राबवून सोमवारी दोन वाजण्याच्या सुमारास मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला. त्यावेळी घटनास्थळी आलेल्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. भोर येथील तहसील कार्यालयात चिरके हे दाखला कारकुन म्हणून काम करीत होते.

भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार सचिन पाटील, मंडल अधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, गाव कामगार तलाठी विद्या गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी, सहायक फौजदार उमेश जगताप व महसूल कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मृत्यूने चांगला सहकारी गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

खोतकर-शिंदे गुप्त भेटीचा व्हिडीओ कसा फुटला? नेटिझन्सचा संशय रावसाहेब दानवेंवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here