BJP Sudhir Mungantiwar | विरोधी पक्ष संवेदनशील आणि सुसंस्कृत असावा. ते इतरांना गद्दार म्हणतात. मग २४ ऑक्टोबर २०१९ ला तुम्ही काय केले? तुम्ही विधानसभेत असंसदीय शब्द वापरता, आम्ही विरोधकांच्या उरावर बसू, असे म्हणता. आता उद्धव ठाकरे विरोधी पक्षात आहेत, त्यांच्याकडून आम्हाला संवेदनशील आणि सुसंस्कृतपणाची अपेक्षा आहे. उद्धव ठाकरे असेही म्हणाले की, सुडाचे राजकारण करू नका.

हायलाइट्स:
- पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचे वडील नव्हते
- मग तुम्ही त्यांचा फोटो निवडणुकीच्या बॅनर्सवर का वापरला?
- सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. रश्मी वहिनींच्या दैनिक ‘सामना’त उद्धव ठाकरे यांनी आज मुलाखत दिली. संजय राऊत यांनीच ही मुलाखत घेतली. त्यामुळे या मुलाखतीचे स्वरूप कौटुंबिक होते. यामध्ये उद्धव ठाकरे यांना कोणतेही अडचणीचे प्रश्न विचारले गेले नाहीत. ही मुलाखत म्हणजे जनतेच्या मनातील आपली भंगलेली प्रतिमा सुधारण्याचा आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होता. मात्र, तो अयशस्वी ठरला, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.
‘माझा श्वास बंद पडला तेव्हा पक्ष फुटायच्या हालचाली सुरू होत्या, ठाण्यातला पालापाचोळा शिवसेना संपवू शकत नाही’
उद्धव ठाकरे म्हणतात की, विरोधी पक्ष संवेदनशील आणि सुसंस्कृत असावा. ते इतरांना गद्दार म्हणतात. मग २४ ऑक्टोबर २०१९ ला तुम्ही काय केले? तुम्ही विधानसभेत असंसदीय शब्द वापरता, आम्ही विरोधकांच्या उरावर बसू, असे म्हणता. आता उद्धव ठाकरे विरोधी पक्षात आहेत, त्यांच्याकडून आम्हाला संवेदनशील आणि सुसंस्कृतपणाची अपेक्षा आहे. उद्धव ठाकरे असेही म्हणाले की, सुडाचे राजकारण करू नका. पण नितेश राणे, नारायण राणे यांच्यावरील कारवाई, देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेली नोटीस आणि हनुमान चालीसा म्हणून पाहणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना १४ दिवस जेलमध्ये टाकून तुम्ही काय केलेत, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
गेल्या ६० वर्षांमध्ये मुख्यमंत्री काम करायचे, त्याची बातमी होत नसे. आईने मुलासाठी स्वयंपाक केला, तर त्यामध्ये बातमी करण्यासारखे काहीही नसते. मात्र, ६० वर्षांमध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री मंत्रालयात गेले, याची बातमी झाली, अशी खोचक टिप्पणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network