अहमदाबाद : गुजरात विषारी दारू प्रकरणात मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अहमदाबाद आणि बोटाद जिल्ह्यातील रोजिद गावात बनावट दारू (Spurious Liquor)प्यायल्याने लोकांची तब्येत बिघडू लागली. इतकंच नाहीतर बनावट दारू प्यायल्यामुळे तब्बल २१ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या तपासात गुंतलेल्या पोलिसांनी मिथेनॉलचा पुरवठा करणाऱ्या जयेश याला पीपलज येथून अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणात एसआयटीकडून घटनेचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बनावट दारू प्यायल्याने बिघडली तब्येत

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद आणि बोटादमध्ये २१ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ज्यांची प्रकृती दारू पिल्याने बिघडली, त्यांनी केमिकलयुक्त पदार्थ प्यायल्याचे तपासात समोर आले आहे. काहींची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेच्या तपासात एकूण पाच-सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

पोलीस भरतीत मैदानात उशीरा आल्याने तरुणीला अमानुष मारहाण, संचालक रात्री खोलीत गेला आणि…
काय आहे संपूर्ण प्रकरण ?

गुजरातमधील बोटाद जिल्ह्यातील रोजिद गावात बनावट दारू प्यायल्याने आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४० हून अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत केमिकल कारखान्याच्या मालकासह १० जणांना ताब्यात घेतलं असून सर्वांची चौकशी सुरू आहे.

हॉटेलमध्ये विदेशी एस्कॉर्टसोबत सेक्स केल्याने झाला मंकीपॉक्स? रुग्ण खोटं बोलत असल्याने खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here