7 year old girl dials mother when her neighbour tries to molest: आई-वडील खरेदीसाठी बाजारात गेले. हीच संधी साधून नराधमाने चिमुकलीच्या घरात प्रवेश केला. लहान भावाला पैसे देऊन दुकानात पाठवले. सातवीत शिकणाऱ्या १२ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. मुलीने प्रसंगावधान राखत आईला फोन केला. याच एका कॉलमुळे नराधमाच्या तावडीतून चिमुकलीची सुटका झाली.

पीडितेने प्रसंगावधान राखत ओक्साबोक्सी रडत दत्तू मामा हात धरत आहेत तुम्ही लवकर या असे कॉल करून आईला सांगितले. यानंतर आई-वडिलांनी त्वरित घर गाठले. तेव्हा आरोपी दत्तू घरातच होता. नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी आरोपीचा तावडीतून चिमुकलीची सुटका करून त्याला बदडून काढत पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network