काही मिनिटांनंतर महिलेला समोरून कॉल आला. आपण ग्राहक न्यायालयातून बोलत असल्याचं फोनवरील व्यक्तीनं सांगितलं. आम्ही पाठवत असलेल्या लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरा असं महिलेला सांगण्यात आलं. तुमच्या तक्रारीवर पुढील प्रक्रिया करण्यासाठी ५ रुपयांचं नाममात्र शुल्क भरा असं फोनवरील व्यक्तीनं सांगितलं.
महिलेनं लिंकवर क्लिक करून तपशील भरला. त्यानंतर तिला मेसेज येऊ लागले. तिच्या खात्यातून सहा व्यवहार झाले आणि बँक खात्यातून ९७ हजार ६६६ रुपये गेले. यानंतर महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली. ‘महिलेला इंटरनेटवर ११ आकडी नंबर सापडला. तो बेस्टचा नंबर असल्याचं त्यांना वाटलं. तिनं त्या नंबरवर फोन करून तक्रार नोंदवली. बसचा नंबरही सांगितला,’ अशी माहिती एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली.
फोनवर बोलणारी व्यक्ती फसवणूक करेल असं वाटलं नव्हतं. मला त्यांच्याकडे बेस्टच्या चालकाची तक्रार करायची होती. मात्र मी फसवणुकीला बळी पडले, असं महिलेनं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसीच्या कलम ४१९, ४२०, ६६ (सी), ६६ (डी) च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Home Maharashtra best bus, बेदरकार ‘बेस्ट’ बस चालकाची तक्रार महागात पडली; महिलेसोबत घडला धक्कादायक...
best bus, बेदरकार ‘बेस्ट’ बस चालकाची तक्रार महागात पडली; महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार – 61 year old woman loses nearly 1 lakh in attempt to report a rash best bus driver
मुंबई: बेदरकारपणे बस चालवणाऱ्या बेस्ट चालकाची तक्रार करणं एका महिलेला महागात पडलं आहे. बेस्ट चालकाची तक्रार करायला गेलेल्या महिलेची १ लाख रुपयांची फसवणूक झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेली महिला लोअर परळ पश्चिमेतील एन. एम. जोशी मार्ग येथील एका कंपनीत काम करते.