Ratnagiri Suicide News : रत्नागिरी तालुक्यातील जांभळगड येथील ४० वर्षीय व्यक्तीने घराशेजारी असलेल्या गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात आज मंगळवारी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हायलाइट्स:
- गोठ्यात गळफास लावून ४० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
- पत्नी गोठ्यात गेली असता प्रकरणाचा उलगडा
- रत्नागिरी तालुक्यातील जांभळगड येथील घटना
प्रकाश दत्ताराम मांडवकर ( वय ४०, रा. जांभुळगड, रत्नागिरी) असं गळफास घेतलेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत पोलिस पाटील जयंत गोपाळ फडके (रा. जांभुळगड, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. रविवार २४ जुलै रोजी रात्री १० वाजता पत्नी प्राजक्ता मांडवरक यांना मी घराशेजारच्या गोठ्यात झोपायला जातो, असं प्रकाश यांनी सांगितलं होतं. पण सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पत्नी प्राजक्ता गोठ्यात गेल्या असता त्यांना पती प्रकाश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केल्यावर शेजारी राहणारे संजय चंदुरकर यांनी त्याठिकाणी धाव घेऊन याबाबत पोलीस पाटील जयंत फडके यांना माहिती दिली. पूर्णगड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.अधिक तपास पोलीस हवालदार महेश कुबडे करत आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : maharashtra ratnagiri jambhalagarh suicide news by hanging
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network