दानिश कनेरिया भारतीय संघाच्या कामगिरीने अगदीच भारावून गेलेले दिसले. भारताचा पहिला बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग मंच, ‘कू’ वर लाइव्ह सत्रादरम्यान त्यांनी याबाबत सविस्तर भाष्य केलं. दानिश आपल्या ‘कू’ पोस्टमध्ये म्हणाले, “मॅच फिनिशर बनणाऱ्या अक्षर पटेलच्या शानदार फलंदाजीसोबत भारताने वेस्टइंडीजमध्ये चमत्कारच केला. काय शानदार खेळी होती! अक्षर म्हणजे क्रिकेटचं अनमोल रत्न आहे. अक्षर अगदीच वाघासारखा खेळला!”
कनेरिया इथेच थांबले नाही. त्यांनी पुढे सांगितले, “मी अगदी मनापासून खेळाचा आनंद घेत होतो. ज्यानी कुणी सामना पाहिला तो व्यक्ती नक्कीच खेळाच्या प्रेमात पडेल. अतिशय अनोखे क्रिकेट बघायला मिळाले आहे. संजू सॅमसनने आपले अर्धशतक बनवले आणि तो अगदी चमकदार खेळ करत होता. पण दुर्दैवाने तो धावबाद झाला.”
अक्षर पटेलबाबत कनेरिया पुढे म्हणाले, “त्याने अगदीच परिपक्व आणि समंजस शैलीत फलंदाजी केली. मात्र तो ‘अक्षर पटेल’ होता, ज्याने भारतासाठी शानदार फलंदाजी केली होती. अक्षर फलंदाजीसाठी आला तेव्हा टीम इंडिया खूप मागे पडलेली होती पण त्याने अगदी व्यवस्थितपणे फलंदाजी करत चित्रच बदलून टाकले. शानदार खेळी करताना त्याने आपल्या करियरचे पहिले अर्धशतक लगावले आणि भारताला विजय मिळवून देण्यासाठी ६४ धावांची उत्कृष्ट खेळी केली. शिखर धवनच्या नेतृत्वात अजून एका मालिकेत विजय मिळवला”.
कनेरिया यांनी संजू सॅमसनचेही कौतुक केले. सॅमसनने वेस्टइंडीजविरुद्ध खेळतानाही अक्षरच्या तडाखेबाज खेळीआधी अर्धशतक बनवले. कनेरिया म्हणाले, “सूर्यकुमार यादव इंग्लंडमध्ये खूप चांगला खेळला होता. त्याने भारतासाठी खूप चांगले शतक लावले होते. मात्र, आता तो वेस्टइंडीजमध्ये थोडा कमकुवत दिसत आहे. गुजरातच्या पुत्राने त्यावेळी आपली चमक दाखवली जेव्हा फलंदाजीची गरज होती आणि ३५ चेंडूंमध्ये धावा करणे आणि बळी घेणे सोपे नव्हते”.
कनेरिया म्हणाले, “संजू सॅमसनमध्ये जी कला आहे, त्यातून तो सामन्यात दीर्घकाळ फलंदाजी करत टिकून राहतो. आज त्याचे नशीब वाईट होते त्यामुळे तो बाद झाला. तो संघाला विजय मिळवून देण्यासाठी खेळत होता. भारताने एक चांगली साखळी मालिका जिंकली. वेस्टइंडीज पराभूत झाला कारण मुळात त्यांची वृत्ती तशी टिकून राहण्याची नाही आणि सोबतच सिराजसारखा गोलंदाजही त्यांच्याकडे नाही”. भारताने आता मालिकेत २-० ने विजयाकडे झेप घेतली आहे. दोन्ही संघ आता बुधवारी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात एकमेकांविरुद्ध उभे राहतील.