गाजियाबाद : जिल्ह्यातील लोनी येथून एक हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिथे दिराने आपल्या विधवा असलेल्या वहिनीच्या डोक्यावर हातोड्याने वार करून हत्या केली आहे. माहितीनुसार, या महिलेला तीन मुलं आहेत आणि या महिलेच्या पतीचा ११ महिन्यांपूर्वी एका अपघातात मृत्यू झाला. ही माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मृतदेहाला ताब्यात घेतला आहे. मृतदेहाला शवविच्छेदानासाठी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपी दिराला अटक केली आहे. चौकशीत त्याने सांगितले की त्याची वहिनी रात्री अनोळखी लोकांशी फोनवर बोलत असे. जे घरात कोणालाच आवडलं नाही. वहिनीला कितीतरी वेळा समजावलं, पण तिने कोणाचचं ऐकलं नाही म्हणून यावरून घरात वाद झाला. आपल्या वहिनीचा एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपीला होता. रात्री उशिरा एक वाजण्याच्या सुमारास आरोपी अभिषेक हा आपल्या वहिनीच्या खोलीत शिरला आणि हातोड्याने तिच्या डोक्यावर व चेहऱ्यावर अनेक वार करून तिची हत्या केली.

चार वेळा विदर्भ केसरी, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अध्यक्षपदी भाजप खासदाराची वर्णी
कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, आरोपीचा मोठा भाऊ गौरव आणि २३ वर्षीय ट्विंकल यांचा विवाह सप्टेंबर २०१७ मध्ये झाला होता. सुमारे ११ महिन्यांपूर्वी मुरादनगर येथे झालेल्या अपघातात गौरवचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ट्विंकल तिच्या तीन मुलांसह सासरच्या घरी राहत होती. गौरवच्या मृत्यूनंतर आरोपी अभिषेक त्याच्या वहिनीकडे सतत संशयाने नजरेने पाहत असे. ती फोनवर दुसऱ्याशी बोलत असते. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेला हातोडाही जप्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

मंकीपॉक्सची लक्षणं काय, संसर्ग झाल्यास काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या या आजाराबाबत सर्व काही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here