मुंबई: अभिनेत्री सखी गोखले (Sakhi Gokhale) हिने मोजके सिनेमे, मालिका करूनही चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. स्टारकिड असूनही तिने तिचा चाहता निर्माण केला आहे. सखी आणि तिचा नवरा अभिनेता सुव्रत जोशी सोशल मीडियावर सतत काही ना काही शेअर करत असतात. मध्यंतरी अभिनयात ब्रेक घेऊन तिने लंडनमध्ये उच्चशिक्षण घेतलं. पण एक गोष्ट अशी आहे जी तिला शाळेच्या आठवणीत घेऊन जाते.

‘ही माझी शाळा आहे. मी बोर्डिंग स्कूलमध्ये राहून शिक्षण पूर्ण केलंय. माझी शाळा निसर्गाच्या सानिध्यात होती. एका टेकडीवर असलेल्या या शाळेच्या पायथ्याला वाहणारी नदी आणि भोवताली डोंगर होते. जेव्हा या शाळेतील शिक्षण पूर्ण झाले तेव्हा आम्ही तिघी मैत्रिणींनी शाळेची आठवण आयुष्यभर जपायचे ठरवले’, असं म्हणत अभिनेत्री सखी गोखले जेव्हा तिचा हात पुढे करून तिची शाळा दाखवते तेव्हा पाहणारे अचंबित होतात. कारण सखीची शाळा प्रतिकात्मक रूपाने तिच्या हातावर गोंदलेली आहे. शाळेचे प्रतीक म्हणून डोंगर, नदी झाडं असा प्रतिकात्मक टॅटू सखीने हातावर काढला आहे. तो टॅटू पाहिला की ती थेट शाळेत पोहोचते आणि रमतेही.

हे वाचा-शाहरुख खान कार्तिक आर्यनच्या कानात नक्की काय म्हणाला? वाचून तुम्हालाही गंमत वाटेल!

ज्येष्ठ अभिनेते मोहन आणि अभिनेत्री शुभांगी गोखले यांची सखी ही मुलगी. सखी जेमतेम सहा वर्षाची असताना तिचे पितृछत्र हरपले आणि त्यानंतर शुभांगी गोखले यांनीच तिला लहानाचे मोठे केले. घराची, सखीची जबाबदारी पेलायची असल्याने शुभांगी यांना अभिनयक्षेत्रात कार्यरत राहणे आवश्यक होते. त्यामुळे सखीची रवानगी बोर्डिंगस्कूलमध्ये झाली.

Sakhi Gokhale

जेव्हा तिचे शालेय शिक्षण संपले त्यापूर्वी सखी बँकॉकला फिरायला गेली होती. तेव्हा तिथे तिने हा टॅटू काढला आहे. तिच्या आणखी दोन मैत्रिणींनी सारखाच टॅटू काढून घेतला आहे. या टॅटूमद्ये नदी, चंद्र आणि डोंगर आहेत.

हे वाचा-VIDEO: रणबीरचं गाणं सुरू होताच प्रेग्नंट आलियाचा धमाल डान्स, करण जोहर म्हणाला…

दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दुनियादारी दोबारा या मालिका, अमर फोटो स्टुडिओ हे नाटक, पिंपळ, दिल दिमाग और बत्ती हा सिनेमा अशी मोजकी पण नेटकी कामं सखीच्या नावावर आहेत. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतील तिचा सहकलाकार सुव्रत जोशी याच्यासोबत लग्न करून सखी लंडनमध्ये तिचे उच्चशिक्षण पूर्ण करण्यासाठी गेली. आता ती भारतात परतली असून लवकरच एका सिनेमात दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here