अहमदाबाद : गुजरातमधील बोटाद आणि अहमदाबाद जिल्ह्यातील रोजिद गावात कथितरित्या बनावट मद्य प्राशन केल्याने आतापर्यंत २१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इतर ४० जण रुग्णालयात दाखल आहेत. विषारी दारू प्यायल्याने अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. गुजरात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि अहमदाबाद क्राइम ब्रँचही तपासात सामील झाले आहेत.

या लोकांनी दारू प्यायली नसून नशेसाठी केमिकल टाकल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. या रसायनामुळे लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. तर टीम आता या रसायनाची माहिती गोळा करत आहेत. पोलिस महानिरीक्षक (भावनगर परिक्षेत्र) अशोककुमार यादव यांनी सायंकाळी बोटाद सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. तर गुजरातचे डीजीपी आशिष भाटिया यांनी सांगितले की, पोलिसांनी तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मृत महिला दीड महिन्यांनी प्रियकरासोबत फिरताना दिसली, तपास करताच पोलिसही चक्रावले

परत आल्यावर ब्रेन डेड…

अहमदाबाद ग्रामीण पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धंधुका येथील शासकीय रुग्णालयातून एका व्यक्तीने नभोई इथे जाऊन दारू प्राशन केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याचे ब्रेन डेड झाले आणि सोमवारी दुपारी त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याच्या रक्तातील साखर ३६ वर गेली असल्याने त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ज्या लोकांचा मृत्यू बनावट दारू प्यायल्याने झाला आहे, त्यापैकी कोणालाही उलट्या, मळमळ, पोटदुखी यासारख्या समस्या झाल्या नाहीत. डोळ्यांच्या दृष्टीवरही परिणाम होत नाही. मिथेनॉल प्यायल्याने असे होत होते. दरम्यान, लोकांना अधिक नशा देण्यासाठी देशी दारूमध्ये आणखी काही रसायन मिसळले गेले असल्याचा संशय असल्याचीही माहिती आहे.

Photos : नाशिकच्या त्रंबकेश्वराला मोठा धोका, निसर्गाच्या चमत्कारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात

६०,००० ला विकत घेतले केमिकल…

चौकशीदरम्यान पकडलेल्या एका आरोपीने सांगितले की, केमिकलची पिशवी विरघळवून पीडितांना थेट खाऊ घालण्यात आली. हे रसायन इमोस केमिकल कंपनीतून काढण्यात आले होते. यामध्ये कंपनीचा व्यवस्थापक जयेश उर्फ राजू याचाही संगनमत समोर येत असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे रसायन राजूने त्याचा नातेवाईक संजयला ६० हजार रुपयांना विकल्याचे बोलले जात आहे.

पोलीस भरतीत मैदानात उशीरा आल्याने तरुणीला अमानुष मारहाण, संचालक रात्री खोलीत गेला आणि…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here