Authored by Maharashtra Times | Updated: Jul 26, 2022, 5:18 PM

यापूर्वी भारतीय संघाचे विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्या असे सात कर्णधार पाहिले आहेत. दोन्ही विजयांसह भारताने मालिका जिंकलेली आहे. त्यामुळे आता भारतीय संघात मोठे प्रयोग होऊ शकतात, असे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे भारताला आता आठवा कर्णधारही मिळू शकतो, असे दिसत आहे.

 

rahul dravid
राहुल द्रविड (सौजन्य-ट्विटर)
पोर्ट ऑफ स्पेन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा वनडे सामना बुधवारी होणार आहे. दोन्ही संघांतील हा तिसरा सामना असेल. पण या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला आता आठवा कर्णधार मिळू शकतो, असे संकेत मिळत आहेत.

वाचा-सिक्सरची कमाल… अक्षर पटेलने भारताला सामना जिंकवत धोनीचा १७ वर्षांपूर्वीचा विक्रम

भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. या दोन्ही विजयांसह भारताने मालिका जिंकलेली आहे. त्यामुळे आता भारतीय संघात मोठे प्रयोग होऊ शकतात, असे चिन्ह दिसत आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघ बऱ्याच गोष्टींची चाचपणी करत आहे, यामध्ये खेळाडूंबरोबर कर्णधारांचाही समावेश आहे. राहुल द्रविड यांनी भारताचे नेतृत्व सांभाळल्यापासून भारताने सात कर्णधार पाहिलेले आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या वनडेमध्ये भारतीय संघाला आठवा कर्णधार मिळू शकतो, अशी चिन्ह दिसत आहेत.

वाचा-मालिका विजयानंतर कर्णधार शिखर धवनने कोणाला दिलं श्रेय, जाणून घ्याल तर तुम्ही म्हणाल…

बीसीसीआयने जेव्हा भारताच्या संघाची घोषणा केली तेव्हा शिखर धवन हा कर्णधार होता आणि रवींद्र जडेजा हा उपकर्णधार होता. पण या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये रवींद्र जडेजा दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्यामुळे त्याच्याजागी श्रेयस अय्यरला भारताचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. भारताने मालिका जिंकलेली आहे. त्यामुळे भारताने जर कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला तर श्रेयस अय्यर हा भारताचा आठवा कर्णधार ठरू शकतो. पण जर रवींद्र जडेजा फिट झाला आणि तो संघात आला तर त्याला हे कर्णधारपद देण्यात येऊ शकते. पण जडेजा तिसऱ्या वनडेसाठी संघात येण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे श्रेयसच्या ललाटी कर्णधारपदाचा टीळा लागू शकतो. यापूर्वी भारतीय संघाचे विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्या असे सात कर्णधार पाहिले आहेत. त्यामुळे आता आठवा कर्णधारही भारताला मिळू शकतो.

वाचा-वनडे क्रिकेटच्या इतिहासात अक्षर पटेलने जे केले ते याआधी कोणीच करू शकले नाही; वाचा वर्ल्ड रेकॉर्ड

भारताने वनडे मालिका जिंकली आहे. त्यामुळे आता तिसरा सामना भारतीय संघाला प्रयोग करण्याची चांगली संधी असेल. त्यामुळे आता जास्त युवा खेळाडूंना या सामन्यासाठी संघात स्थान मिळू शकते. त्यामुळे तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात कोणते बदल केले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here