अकोला : आमदार अमोल मिटकरी आपल्या आक्रमक शैलीमुळे नेहमी चर्चेत असतात. विरोधकांवर आक्रमकपणे टीका करणे यामुळे ते ओळखले जातात. याचदरम्यान, मिटकरींनी अकोला जिल्ह्यातील खिनखेड पूर्णा याठिकाणी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत असताना राज्यात असलेल्या शिंदे सरकारला चांगलेचं धारेवर धरलं असल्याचं पाहायला मिळालं. साडेचारशे हेक्टरच्यावर शेती खरडून गेली आहे. जिल्ह्याला सध्या पालकमंत्री नाहीत, महाराष्ट्राला कृषीमंत्री नाहीत, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

जेव्हापासून राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात आले तेव्हापासून ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्या आमच्या काळात होणार नाही, असं पहिल्या दिवशी देवेंद्र फडणवीस बोलले होते. मात्र, दिल्लीला, गुवाहाटीला आणि सुरतला जायला पैसे आहेत आणि शेतकऱ्यांना देण्यासाठी या सरकारजवळ पैसे नाही. अशी टीका देखील आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत द्यावी अन्यथा हे होत नसेल तर, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘चुल्लूभर पाण्यात जीव द्यावा’, असं म्हणत मिटकरींनी शिंदे सरकारवर तोफ डागली.

उद्धव ठाकरे अचानक नावडते कसे? शिंदे गटातील प्रत्येकाची वेगळी कहाणी, जयंत पाटलांनी डिवचलं
काही दिवसांपूर्वी अमोल मिटकरी बारामती दौऱ्यावर आले होते. यावेळी देखील त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. ते म्हणाले की, दोन मंत्र्यांचं असणारं हे सरकार लवकरच बरखास्त झालेलं दिसेल आणि मध्यावधी निवडणुका लागल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चांगली कामगिरी दिसेल. असा विश्वास त्यांनी यावेळी दर्शवला. ते त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते.

नागपूरमध्ये आंदोलनादरम्यान राडा, काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीपिओ चौकात पेटवली कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here