मुंबई: बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) जेवढा प्रसिद्ध आहे तितकीच त्याची बायको गौरी खान (Gauri khan) देखील प्रसिद्ध आहे. गौरीची गणना आघाडीच्या इंटिरीअर डिझायनर्समध्ये केली जाते. एकीकडे शाहरुख त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत त्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे. तर दुसरीकडे त्याची बायको गौरी बी टाऊनमधील अनेक कलाकारांची घरे सजवण्यासाठी प्रसिद्ध आहे.

हे वाचा-मराठमोळा अभिनेता कल्याणमध्ये चालवायचा रिक्षा आता घेतली अलिशान कार

गौरी ही इंटिरीअर डिझायनर तर आहेच याशिवाय ती शाहरुखच्या रेड चिलीज एंटरटनेमेंटचही (Red Chilies Entertainment) काम उत्तमरित्या सांभाळत आहे. गौरीनं कलाकारांची घरं तर सजवली आहेच, शिवाय स्वतःचं घर देखील अप्रतिम सजवलं आहे. अलिकडेच गौरीनं त्यांच्या मन्नत या आलिशान बंगल्यात काही नवीन बदल केले. त्याचे काही मोजके फोटो तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ते फोटो पाहून चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत.


गौरीनं जे फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोत ती मोठ्या आकर्षक अशा खुर्चीवर स्टाईलमध्ये बसलेली दिसत आहे. तिच्या पाठीमागे घरातील एक भिंत दिसत असून त्यावर गौरीनं तिच्या कल्पकतेनं साकारलेलं एक ब्लॅक अँड व्हाईट असं डिझाइन दिसत आहे. पांढऱ्या रंगाच्या भिंतीवर ते डिझाईन खूपच आकर्षक दिसत आहे.

गौरी खान

हे वाचा-‘महिला शरीर दाखवू शकतात तर पुरुष का नाही?’ असं काय बोलून गेले राम गोपाल वर्मा…

गौरी आणि शाहरुख खान यांचा मन्नत हा आलिशान बंगला खूपच सुंदर आहे. या दोघांचा हा बंगला कोणत्याही आलिशान महालापेक्षा कमी नाही. अर्थात हे आलिशान घर उभं करण्यासाठी शाहरुखनं दिवसरात्र मेहनत घेतली आहे. तर गौरीनं हे घर सजवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. शाहरुखनं हे आलिशान घर २०११ मध्ये १३.३२ कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. आज या घराची किंमत ३५० कोटी रुपये इतकी आहे.

शाहरुखनं जेव्हा हे आलिशान घर खरेदी केलं तेव्हा त्याला जन्नत हे नाव द्यायचं होतं. परंतु नंतर त्यात बदल करून मन्नत हे नाव दिलं. आलिशान घर खरेदी करणं त्याचं स्वप्न होतं आणि ते त्यानं प्रत्यक्षात आणलं. या घरातील प्रत्येक वस्तू गौरीनं स्वतः लक्ष घालून खरेदी केली आहे. त्यामुळे हे घर आणि यातील प्रत्येक वस्तू अनमोल आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here