याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण आणि महिला शेजारी रहायला होते. आदल्या दिवशी किरकोळ कारणाहून त्यांच्यात भांडण झाले होते. त्यावेळी जेबा हिने त्या तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी नयन हा घरातून निघून गेला. तो रात्री उशिरापर्यंत घरात आलाच नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या घरच्यांनी समर्थ पोलिसात तक्रारही दिली होती. मात्र, सोमवारी ( दि.25) रोजी त्याचा मृतदेह हडपसर येथील कॅनॉलमध्ये आढळून आला.
यानंतर मुलाच्या नातेवाईकांनी समर्थ पोलिसात धाव घेत महिला जेबा विरुद्ध हत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी जेबा विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास खडक पोलीस करत आहेत.