Uddhav Thackeray interview in saamana | आरे कारशेडच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे आक्रमक. आज ना उद्या कांजूरला हात घालावा लागणारच आहे. आतासुद्धा पुन्हा एकदा सांगतो की, आरे इथे कारशेड करताना यांनी जे प्रतिज्ञापत्र कोर्टात दिलंय की, एवढी जागा आम्ही वापरणार नाही, पण तेवढी जागासुद्धा त्यांना वापरावीच लागणार आहे, जिथे झाडं आहेत. तर केवळ तुमच्या हट्टापायी आरेमध्ये कारशेड करू नका

हायलाइट्स:
- मुख्यमंत्री महाराष्ट्राचा असतो तो केवळ मुंबई, ठाणे किंवा नागपूरचा नसतो
- मी मुख्यमंत्री असताना जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मी वने वाढवली आहेत
- मुंबईतसुद्धा मी ८०० एकर जंगल घोषित केले
आरे परिसरात मेट्रोची कारशेड बांधल्याने मुंबईच्या पर्यावरणाचा घात होईल, असे काही करू नका. कारण तिकडे झाडांची कत्तल केल्यानंतरही बिबटया आणि इतर प्राण्यांचा वावर आहे. तिथे वन्यजीव असल्याचा रिपोर्टही आहे. कदाचित देवेंद्र फडणवीस मुंबईच्या बाहेरचे असल्याने यांना मुंबईबद्दल प्रेम नाही की काय?, असा प्रश्न पडतो. मुख्यमंत्री महाराष्ट्राचा असतो तो केवळ मुंबई, ठाणे किंवा नागपूरचा नसतो. मी मुख्यमंत्री असताना जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मी वने वाढवली आहेत. याचे मला समाधान आहे. मुंबईतसुद्धा मी ८०० एकर जंगल घोषित केले. अनेक रिझर्व्ह फॉरेस्ट मी घोषित केले. येणारया काळात आणखी काही होणार होते. कारण शेवटी पर्यावरण महत्त्वाचे आहे. पर्यावरण संपले तर ऑक्सिजन कुठून आणणार?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारने गेल्या सरकारच्या काळातील अनेक निर्णय स्थगित केल्याचा मुद्दाही उपस्थित केला. तसेच माझ्यावरच राग तुम्ही मुंबईवर काढू नका, असेही त्यांनी सांगितले. मेट्रो कारशेडच्या परिसरात वन्यजीवांचा वावर आहे. त्याऐवजी कांजूरला ओसाड जागा आहे. ती कारशेड तिथे केली तर हीच मेट्रो आपल्याला अधिक लोकसंख्येसाठी वापरता येईल. आज ना उद्या कांजूरला हात घालावा लागणारच आहे. आतासुद्धा पुन्हा एकदा सांगतो की, आरे इथे कारशेड करताना यांनी जे प्रतिज्ञापत्र कोर्टात दिलंय की, एवढी जागा आम्ही वापरणार नाही, पण तेवढी जागासुद्धा त्यांना वापरावीच लागणार आहे, जिथे झाडं आहेत. तर केवळ तुमच्या हट्टापायी आरेमध्ये कारशेड करू नका, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : shivsena chief uddhav thackeray slams bjp devendra fadnavis over metro car shed in aarey forest mumbai
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network