Uddhav Thackeray Birthday: उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर मोठी सजावट करण्यात आली आहे. मातोश्रीचे प्रवेशद्वार फुलांनी सजवण्यात आले आहे. प्रवेशद्वारावर फुलांनी धनुष्यबाणाची प्रतिमा साकारण्यात आली आहे. आता शिवसैनिका मातोश्रीवर जमल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्या काय संवाद साधणार, हे पाहावे लागेल. वाढदिवसाच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनला दिलेली मुलाखत सध्या चर्चेचा विषय आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला .

 

Uddhav Thackeray birthday Celebration
उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस

हायलाइट्स:

  • उद्धव ठाकरे यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे
  • मातोश्रीचे प्रवेशद्वार फुलांनी सजवण्यात आले आहे
  • ‘तुम जियो हजारो साल… हॅपी बर्थडे साहेब’
मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे. शिवसेनेतील बंडाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा यंदाचा वाढदिवस विशेष ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी अनेक शिवसैनिक त्यांना मातोश्रीवर शुभेच्छा द्यायला जातात. यंदाही मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवसैनिकांची तशीच रीघ लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मंगळवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता मातोश्रीवर शिवसैनिकांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी भलामोठा केक आणण्यात आला होता. यावेळी मातोश्रीवर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘तुम जियो हजारो साल… हॅपी बर्थडे साहेब’, असा गाण्याच्या ओळी गात शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. मातोश्रीवरील या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे दोघेही दिसत आहेत. (Shivsena chief Uddhav Thackeray Birthday)
Uddhav Thackeray: ‘फडणवीस बाहेरचे, त्यांना मुंबईबद्दल प्रेम नसावे?’ आरे कारशेडच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी डिवचलं
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर मोठी सजावट करण्यात आली आहे. मातोश्रीचे प्रवेशद्वार फुलांनी सजवण्यात आले आहे. प्रवेशद्वारावर फुलांनी धनुष्यबाणाची प्रतिमा साकारण्यात आली आहे. आता शिवसैनिक मातोश्रीवर जमल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्याशी काय संवाद साधणार, हे पाहावे लागेल. वाढदिवसाच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनला दिलेली मुलाखत सध्या चर्चेचा विषय आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, शिवसेनेतील बंडखोरी, भाजप, हिंदुत्त्व आणि आगामी काळातील शिवसेनेची रणनीती अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
अखेर उद्धव ठाकरेंनी सांगितला बंडखोरांची धाकधूक वाढवणारा ‘प्लॅन’; वादळ निर्माण करण्याचा दावा
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी एकनाथ शिंदेंच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी ट्विटर हँडलवरुन ठाकरेंना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना….” असे एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : uddhav thackeay birthday celerbation on matoshree by shivsena party workers
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here