बेल्लारी : भाजपच्या युवा नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रवीण नेतरू हे बेल्लारी इथे पोल्ट्रीचे दुकान चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रात्री दुकान बंद करून ते घरी परतत असताना मागून दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बेल्लारी इथे ही घटना घडली आहे. या हत्येमागचं कारण अद्याप पोलिसांना सापडलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मारेकऱ्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे सांगितले.

‘पैसे द्या नाही तर मुलासह तुम्हाला ठार मारेन आणि मी…’, प्रसिद्ध व्यापाऱ्याला आलेल्या धमकीच्या पत्राने खळबळ
दरम्यान, प्रवीणचा मृतदेह पुत्तूर येथील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रुग्णालयाभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचवेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी भाजप युवा मोर्चाच्या नेत्याच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मारेकऱ्यांना कडक शिक्षा होईल – CM बोम्मई म्हणाले

या घटनेवर सीएम बोम्मई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुल्या येथील भाजप कार्यकर्ता प्रवीण नेतरू यांची निर्घृण हत्या निंदनीय आहे. ही घटना घडवून आणणाऱ्या मारेकऱ्यांना लवकरच अटक करण्यात येईल. त्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा केली जाईल. प्रवीण यांच्या आत्म्याला शांती लाभो, देव त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती:’ असं त्यांनी म्हटलं आहे.

महिलेच्या त्रासाला कंटाळून तरुणाचं टोकाचं पाऊल, कुटुंबियांचा धक्कादायक आरोप; पुण्यात खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here