मुंबई : अमरावतीमधील औषध विक्रेता व्यावसायिक (केमिस्ट) उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी शाहरुख पठाणवर मुंबईतील आर्थर रोड कारागृहात हल्ला झाला आहे. पाच जणांकडून त्याला मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे.

या घटनेमुळे संपूर्ण कारागृहात खळबळ उडाली असून सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती आहे. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे समर्थन करणारी पोस्ट उमेश यांनी व्हॉटसअॅपवर फॉरवर्ड केली, या रागातून कट रचून त्यांची हत्या करण्यात आली, असा संशय आहे.

इन्स्टाग्रामवर असाल तर सावध व्हा! १९ वर्षाच्या नराधमाकडून पॉर्नचं जाळं, २२ महिलांसोबत धक्कादायक कृत्य
उमेश हे २१ जून रोजी रात्री आपल्या दुकानातून घरी परतत असताना अमरावतीमधील घंटाघर परिसरात त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी हत्येच्या कटाचा कथित सूत्रधार शेख इरफान शेख रहिम याच्यासह मुदस्सर अहमद (२२), शाहरुख पठाण (२५), अब्दुल तौफिक (२४), शोएब खान (२२), अतिब रशीद (२२) व युसुफ खान (३२) या सात जणांना अटक केली.

राजस्थानमधील उदयपूरमध्येही नुपुर शर्मांच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या एका शिंप्याची हत्या झाल्यानंतर त्या प्रकरणाचा तपास एनआयए करत होती. त्यामुळे उमेश यांच्या हत्येचा तपासही एनआयएने आपल्याकडे घेतला आणि सर्व सात आरोपींविरोधात बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यासह (यूएपीए) अन्य कायद्यांतील कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

गोदावरी नदीला पूर, अनेक मंदिरं पाण्याखाली; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here