पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर १९ वर्षीय प्रशांत आदित्यला त्याच्या गुजरातमधील गांधीनगर येथील घरातून अटक करण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहावीत नापास झाल्यानंतर आरोपी मास्क बनवणाऱ्या कंपनीत काम करू लागला. विशेष म्हणजे आदित्य त्याच्या समाजातील महिलांनाच टार्गेट करत होता. त्याने, १४ जुलैला आरोपीने समाजातील किमान २२ महिला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या प्रकरणाबाबत अँटॉप हिल पोलिसांशी संपर्क साधला आणि सर्व त्रास सांगितला. आरोपीच्या या कृत्यामुळे म्हणजेच अश्लील क्लिप पाठवल्या जात असल्याने मानसिक छळ, भीती आणि छळ होत असल्याचे पीडितांनी पोलिसांना सांगितले. पाठवलेल्या क्लिप बहुतेक ३० सेकंदांच्या होत्या असंही त्यांनी सांगितलं.
DP वर ठेवलेल्या मुलांच्या फोटोवर लिहायचा ‘RIP’
पोलिसांनी आरोपींविरुद्ध केलेल्या तपासात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. काही प्रकरणांमध्ये, ज्या महिलांनी त्यांच्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर डीपी म्हणून वापरले होते, त्यांच्या फोटोवर ‘RIP’ लिहले आणि पाठवले. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेबाबत भीती निर्माण झाली होती. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी अंतर्गत महिलेचा विनयभंग, लैंगिक छळ, खंडणी इत्यादी प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. यासोबतच IT कायद्याचे कलम 67A (लैंगिक कृत्ये प्रसारित करण्याबाबतची शिक्षा इ.) देखील लागू करण्यात आली आहे.
बहुतेक पीडित महिलांचे आहेत इंस्टाग्राम खाते
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसीपी अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि डीसीपी संजय पाटील यांच्या देखरेखीखाली एक पथक नेमण्यात आले होते. महिलांची फसवणूक केल्याच्या या प्रकरणातील मुख्य तक्रारदार ४० वर्षीय महिला असून ती एका कंपनीत काम करते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्यने अँटॉप हिल इथे २२ महिलांसह ४९ महिलांना टार्गेट केल्याचा पोलिसांना संशय आहे. परंतु पुढील तपासानंतरच याची पुष्टी होईल.
तपासादरम्यान, पोलिसांना आढळले की बहुतेक पीडितांचे इन्स्टाग्रामवर खाते होते. आदित्यने पीडितांना पेमेंटसाठी पाठवलेला QR कोड गुजरातमधील एका ट्रॅव्हल एजन्सीचा असल्याचे तपासकर्त्यांना आढळून आले. आपले बँक खाते नाही आणि आपल्या पगारासाठी QR कोड वापरायचा आहे, असं सांगून तो या एजन्सीचा कोड वापरत होता. यासाठी तो प्रति व्यवहार ५० रुपये एजन्सीला द्यायचा.