ग्वाल्हेर : विद्युत विभागाच्या मोठ्या चुकीमुळे एका व्यक्तीची प्रकृती खालावली आहे. वीज कंपनीने संबंधित ग्राहकाला इतकं बिल (Electricity Bill) पाठवलं की आकडा पाहून त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू आहे.

खरंतर, ग्वाल्हेरमध्ये मध्य प्रदेश सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या वीज कंपनीने एका कुटुंबाचे वीज बिल चुकीचे छापले. ज्यामध्ये ३,४१९ कोटी रुपयांची रक्कम छापलेली पाहून ती व्यक्ती आजारी पडली. या घटनेचा खुलासा झाल्यानंतर कुटुंबाला योग्य बिल देण्यात आलं आहे. पण तोपर्यंत सगळ्यांनाच चिंता होती.

इन्स्टाग्रामवर असाल तर सावध व्हा! १९ वर्षाच्या नराधमाकडून पॉर्नचं जाळं, २२ महिलांसोबत धक्कादायक कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथे रहिवासी असलेल्या प्रियंका गुप्ता यांना ३,४१९ कोटी रुपयांचे वीज बिल आल्याचं सांगण्यात येत आहे. हे पाहून सासरे थेट आजारी पडले. सध्या मध्य प्रदेश सरकार चालवत असलेल्या वीज कंपनीने याला ‘मानवी चूक’ म्हटलं आहे. त्याचवेळी शहरातील शिव विहार कॉलनीतील गुप्ता कुटुंबीयांना दिलासा देत त्यांना १३०० रुपयांचे योग्य बिल जारी करण्यात आले आहे.

महिलेच्या त्रासाला कंटाळून तरुणाचं टोकाचं पाऊल, कुटुंबियांचा धक्कादायक आरोप; पुण्यात खळबळ

कोट्यवधींचे वीजबिल पाहून व्यक्ती पडली आजारी

प्रियंका गुप्ता यांचे पती संजीव कांकणे यांनी सांगितले की, जुलै महिन्याच्या घरगुती वापराच्या वीज बिलावर कोट्यवधी रुपये पाहून तिचे वडील आजारी पडले. विद्युत वितरण कंपनीच्या पोर्टलवरून उलटतपासणी केल्यानंतर २० जुलै रोजी जारी केलेले बिल बरोबर असल्याचे संजीव कांकणे यांनी सांगितले.

Breaking: उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीवर आर्थर रोड कारागृहात हल्ला, ५ जणांकडून मारहाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here